दहा गुंठे जमीनवर गुलाब लागवडीसाठी शशिकांत यांनी चांगला प्लँन्ट निर्माण केला आहे. यासाठी पाण्याचा कमी वापर व्हावा या दृष्टीने ठिंबक सिंचन करण्यात आले आहे. तसेच पॉलीहाऊस निर्माण करुन पिकांची पोत सांभाळण्यासाठी काळजी घेण्यात आली आहे. यासाठी पहिल्या वर्षी जवळपास ३५ ते ४० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षे याचा उत्पन्नासाठीच लाभ होणार आहे. इतर पिकापेक्षा कमी पाणी आणि अधिक उत्पन्न यादृष्टीने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. माळरानावर फुलवलेली गुलाबाची शेती आता बहरात असुन या बागेतुन निघणारी गुलाबाची फुले शशिकांत काटुळे हे परळी व परिसरात विक्रीला ठेवत आहेत. या शेतीमधुन त्यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकर्यांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे. परिसरातील अनेक शेतकरी या बागेला भेट देण्यासाठी गर्दी करतांना दिसत आहेत. आपल्याकडे दुष्काळ असतांना शेती बाबत मोठी चिंता निर्माण झाली होती. पाऊस झाल्यावर आपल्या शेतीतून अधिक उत्पन्न घेण्यासाठी विचार करत असतांना गुलाबाची शेती करावी हे सुचले यासाठी विविध ठिकाणी जाऊन पाहणी केली, कृष्षी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले व दहा गुंठे जमीनीवर हा प्रयोग करुन पहिला. माझी शेती यशस्वी झाली असुन निश्चितच इतर पिकांपेक्षा मला गुलाबाच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळत आहे.
शशिकांत काटुळे शेतकरी, पांगरी,
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com




