👁 5 Views

म्हैसाळ चे पाणी जुलै अखेर मंगळवेढ्यात : आ भारत भालके

पंढरपूर LIVE 21 Jun 2018

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
दुष्काळी मंगळवेढयाच्या दक्षिण भागासाठी लाभ दायी ठरणारी सहाव्या टप्प्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही तालक्यात पूर्णत्वास येत असुन येत्या जुलै अखेर वितरिका क्र एक मधून शिरनान्दगी तलावात पानी येण्याचे नियोजन झाले असल्याची माहिती आ भारत भालके यांनी दिली ते बुधवारी पंढरपुर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या  सिंचन योजनेच्या कामाच्या आढावा बैठकीनंतर बोलत होते. या बैठकीस अधीक्षक अभियन्ता हणमंत गुनाले कार्यकारी अभियन्ता विजय पाटील उपविभागीय अभियन्ता राजेंद्र गाजी कनिष्ठ अभियन्ता वसन्त खबाले सहा अभियन्ता सुभाष देवकते उपस्थित होते.
मागे मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हे काम मे अखेर पूर्ण होउन जून अखेर पाणी येणार असे सांगण्यात आले होते मात्र सदर कामासाठी आलेले कामगार हे बांगलादेशी असल्याने ते कामगार त्यांच्या देशातील स्थानिक निवडणुकीसाठी परत गेल्याने हे काम तीन महीने पुढे गेले आणि काम पूर्ण होण्यास विलंब झाला अशी माहिती कामाच्या दिरंगाई बाबत आ भालके यांनी
विचारणा  केली असता अधीक्षक अभियंता हणमंत गुनाले यांनी दिली वितरिका क्र दोन मधील कामे प्रगती पथावर आहेत नोव्हेंबर मध्ये त्या भागाला पाणी मिळणार आहे  या योजनेच्या कामासाठी निधी  उपलब्ध असताना मंगळवेढा तालुक्याला पाणी येण्यासाठी सम्बंधित कामाची गती वाढवून लवकरात लवकर कामे पूर्ण झाली पाहिजेत अशी सुचना या बैठकीत देण्यात आली  दक्षिण भागातील हुन्नूर, रेवेवाडी ,महमदाबाद, लोणार, पडोळकरवाडी, मारोळी, शिरनान्दगी, चिक्कलगी,जंगलगी,सलगर (बू), सलगर(खु),बावची ही,म्हैसाळ योजनेचा लाभ होणारी गावे आहेत या प्रसंगी तानाजी काकड़े पांडुरंग चौगुले  सुरेश कोळेकर सुरेश कांबळे अंकुश पडवळे बसवराज पाटील द्यानेश्वर खांडेकर नितिन पाटील अशोक जाधव दत्ता कांबळे सम्भाजी पाटील नाथा काशिद पांडु हलगे आनंदा आमुगे यशवंत होळ कर खुशबा पडवळे शहजान पटेल भारत पाटील सिद्धेश्वर भुसनर सचिन नागणे शंकर लांडगे मरगु कोळेकर जगु रेवे गौड़पा बिराजदार गुलाब माने राजू पुजारी गुलाब थोरबोले श्रीशैल्य धायगोंडे दिनेश पाटील आदि उपस्थित होते  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *