👁 7 Views

शेतकर्‍यांचे राष्ट्रीय आंदोलन यशस्वी झाले!- श्रीकांत तराळ

पंढरपूर LIVE 27 Jun 2018

‘‘राष्ट्रीय किसान महासंघाचे मुख्य मार्गदर्शक श्रीकांत तराळ यांच्या पंढरीतील पत्रकार परिषदेचा सविस्तर व्हिडीओ रिपोर्ट’’

आज पंढरपूरमध्ये  राष्ट्रीय किसान महासंघाचे  मुख्य मार्गदर्शक श्रीकांत तराळ यांनी पत्रकार परिषद घेतली. 1 ते 10 तारखेच्या दरम्यान राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेला देशव्यापी शेतकरी संप संप यशस्वी झाला आहे. देशभरातला शेतकरी रिअ‍ॅक्ट होतोय याची दखल शासनाने घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर 7 राज्यात स्वतंत्र बैठकही झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आम्ही पुकारलेल्या शेतकरी संपाला शरद पवारांनी पाठिंबा दिला; परंतु शरद जोशी, राजु शेट्टी, रघुनाथदादा पाटील या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी मात्र या संपाला विरोध दर्शविला होता. परंतु माहाराष्ट्रासह संपुर्ण देशभरात हा संप शांततेत यशस्वी झाला. येत्या 4 व 5 जुलै रोजी राष्ट्रीय महासंघाची दिल्ली येथे बैठक होणार असून या बैठकीत 9 जुलै रोजी क्रांतीदिनाच्या दिवशी ‘शेतकरी विरोधी सरकारचा निषेध दिन’ म्हणून आंदोलन केले जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या पत्रकार परिषदेला लक्ष्मण वंगे, शंकरत दरेकर, नितीन थोरात, बळीराम चेडे, राजाराम पाटील, दिलीप चव्हाण, कैलास पवार, माऊली जवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना श्रीकांत तराळ यांनी राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकर्‍यांच्या हितासाठी केलेल्या व पुढील काळात करण्यात येणार्‍या आंदोलनासंदर्भात अधिक माहिती दिली.    


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *