👁 9 Views

पंढरपूर येथे डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन

पंढरपूर LIVE 6 July 2018

   पंढरपूर दि. 06 : भारतीय डाक विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश सेवा) यांच्या संयुक्त विद्मामाने डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार विजयसिंह मोहिते पाटील व खासदार शरद बनसोडे यांच्याहस्ते करण्यात आले.
            नवी पेठ सब पोस्ट कार्यालय, पंढरपूर   येथे डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राच्या उदघाटना प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक,, नगराध्यक्षा साधना भोसले, विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे, क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले , प्रांतधिकारी सचिन ढोले  आदी मान्यवर उपस्थित होते.
            या कार्यक्रमाप्रसंगी खासदार शरद बनसोडे बोलताना म्हणाले,  पोस्ट कार्यालयामार्फत केंद्र शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात. पोस्ट कार्यालय ग्रामीण भागाशी सर्व सामान्य जनतेशी निगडीत असल्याने सर्व सामान्य जनतेपर्यंत पासपोर्ट ऑफीस पोहचले आहे.  या पासपोर्ट सेवा केंद्राचा लाभ सर्व नागरीकांना घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. खासदार विजयसिंह  मोहिते पाटील बोलताना म्हणाले माढा येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यास मान्यता मिळाली असून, फलटण येथे पासपोर्ट सेवा कार्यालय सुरु करावे अशी त्यांनी यावेळी केली.
            विदेश मंत्रालयाचे सचिव  ज्ञानेश्वर मुळे बोलताना म्हणाले,  विदेश मंत्रालयाने‘ पासपोर्ट आपके व्दार ’ ही योजना हाती घेतली असून या योजनेतंर्गत देशातील 125 कोटी जनतेला त्यांच्या गावापर्यंत पासपोर्ट मिळावा  अशी केंद्र शासनाची भुमिका आहे. विदेश मंत्रालयामार्फत आत्तापर्यंत 214  पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आली असून, पंढरपूर येथे 215 वे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आले असल्याची माहिती  सचिव मुळे यांनी यावेळी दिली. पासपोर्ट  गतीशिलतेचे लक्षण आहे. विदेश मंत्रालयामार्फत पासपोर्ट सेवा अधिक सुलभ करण्यात आली असून यासेवेचा लाभ नागरीकांनी घ्यावा असे आवाहनही सचिव मुळे यांनी केले. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *