👁 8 Views

शेतकऱ्यांच्या समस्या कायम… दररोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पंढरपूर LIVE 13 July 2018


शेतक-यांच्या समस्या राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करुनही संपलेल्या नाहीत. राज्यातील १३०७ शेतक-यांनी जानेवारीपासून आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये दररोज ७ शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. फडणवीस सरकारने गेल्या वर्षी शेतक-यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. पण शेतक-यांच्या आत्महत्या तरीही थांबलेल्या नाहीत.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात)

१३९८ शेतक-यांनी गेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत आत्महत्या केल्या होत्या. हा आकडा यंदाच्या वर्षाचा विचार केल्यास ९१ ने खाली आला आहे. पण राज्याच्या विविध भागांचा विचार करता आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये मराठवाड्यात ४७७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये मराठवाड्यातील ४५४ शेतक-यांनी त्यांचे आयुष्य संपवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भातील परिस्थितीदेखील चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये विदर्भात ५९८ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. आतापर्यंत जवळपास ३८ लाख शेतक-यांना याचा लाभ मिळाला आहे. पण लाखो शेतक-यांपर्यंत अद्यापही कर्जमाफीचा लाभ पोहोचला नसल्यामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बँका शेतक-यांना जुन्या कर्जाची परतफेड न केल्याने नव्याने कर्ज देण्यास तयार नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 


Whatsup- 8308838111, 7083980165 


Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *