👁 7 Views

स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी गोपाळपूर केले चकाचक तर स्वेरी परिवाराने केला मंदिर परिसर स्वच्छ !

पंढरपूर LIVE 17 July 2018

 
 स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकॉलेज ऑफ फार्मसीच्या कमवा आणि शिका’ योजनेमधील स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग हे गोपाळपूर व पंढरपुरातील मंदिर परिसरात ‘वारी पूर्व स्वच्छता’ अभियान राबविले.


पंढरपुरात होत आहे स्वेरीच्या उपक्रमांचे कौतुक !

पंढरपूरः-आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच! अवघ्या भक्तगणांचा व वारकऱ्यांचा मेळा या वारीच्या रूपाने चंद्रभागेच्या वाळवंटी जमतो. अशा आषाढी वारीच्या निमित्ताने स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ‘वारी पूर्व स्वच्छता’ अभियान राबविण्यात आले. यामध्ये कमवा आणि शिका’ योजनेमधील स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरमध्ये स्वेरी परिवारातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या महास्वच्छता मोहिमेत सहभाग घेवून मंदिर परिसर स्वच्छ केले.
            स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली  गोपाळपूर मधील शिवाजी चौक, इंदिरा कॉलनी, मातोश्री वृद्धाश्रम, म्हाडा कॉलनी, गोपालकृष्ण मंदिर परिसर याठीकाणी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात कमवा आणि शिका’ उपक्रमाचे प्रमुख प्रा. यशपाल खेडकर व  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम.शिंदे व डॉ. रंगनाथ हरिदास यांच्या नेतृत्वाखाली जवळपास १५० इतक्या विद्यार्थ्यांना घेवून गोपाळपूर परिसर स्वच्छ केले. पंढरपुर शहरात सहा वाजता तर गोपाळपूरमध्ये सकाळी सात वाजता स्वच्छतेला सुरवात केली साधारण दोन्हीकडे तीन तास स्वच्छता मोहीम राबवीत होते. प्राध्यापकांनी पंढरपुरातील मंदिर परिसराची स्वच्छता केली. पाटी खोऱ्याच्या सहाय्याने प्लास्टिक पिशव्या, केर-कचरा एकत्रित गोळा करून एकेठिकाणी जमा करत होते. अधून मधून पावसाने व्यथ्यय आणला परंतु अखेर वारी पूर्व स्वच्छतेची मोहीम फत्ते झाली. स्वेरीने केलेल्या स्वच्छता अभियानामुळे गोपाळपूर तसेच पंढरपूर मधील स्वच्छता आणि आरोग्य जपले गेले. या उपक्रमाचे स्वागत व कौतुक करत होते. गोपाळपूरमध्ये ग्रामसेविका सौ पाटील यांच्यासह ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते तर पंढरपुरातील मंदिर परिसरात राबविल्या गेलेल्या ‘महास्वच्छता’ अभियानात जिल्हाधिकाऱ्यांसह, तहसीलदार , मंदिर समिती अध्यक्ष व पदाधिकारी, इतर शाळा, महाविद्यालये, शासकीय पदाधिकारी सहभागी झाले होते. स्वेरीचे बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुलकर्णी, डिप्लोमाचे इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी, प्रशासन अधिष्ठाता डॉ. एस.एम.मुकणे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, संशोधन अधिष्ठता डॉ. एम.एम.पाटील. वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी कमवा आणि शिका’ योजनेचे व राष्ट्रीय सेवा योजनेतील मिळून जवळपास १५० विद्यार्थी- विद्यार्थिनी या वारी पूर्व स्वच्छ्ता मोहिमेत सहभागी झाले होते. अभियान यशस्वी करीत परिसर स्वच्छ ठेवण्याचा ध्यासच जणू स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच समाजसेवेची अखंड परंपरादेखील स्वेरीने जपलेली आहे. याचीच चर्चा गोपाळपूर व पंढरपूर परिसरात दिवसभर होत होती.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *