जळगाव : नशिराबाद येथील वृद्धा धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच ठार झाली. कैसाबाई मंगा भोई (वय ६५, रा.
रविवारी (ता. २९) दुपारी चारला कैसाबाई भोई जळगाव ते भादली अप लाईनवर रेल्वे रूळ ओलांडत असताना, धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. याबाबत रेल्वे गाडीचालकाने जळगाव रेल्वेस्थानक प्रबंधकांना माहिती दिली
नंतर घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना देण्यात आली. त्यावरून नशिराबाद पोलिस घटनास्थळी पोचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला.
सोमवारी (ता. ३०) सकाळी दहाला विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक फौजदार अतुल महाजन तपास करीत आहेत.



