पंढरपूर LIVE 18 July 2018
पंढरपूर, दि. 18 – मुखात हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे आगमन झाले.
पालखीच्या स्वागतासाठी सकाळी 7 वाजल्यापासून सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सराटी पुलावर वारकरी, भाविक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी होऊ लागली. या ठिकाणी विविध योजनांबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. निरा नदी ओलांडून सुमारे साडेआठच्या सुमारास तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री विजय देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अश्व पूजन व पादुका पूजन केले. पालखी स्वागतस्थळापासून ते अकलूज शहरापर्यंत पालखीचे सारथ्य पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि आमदार हणमंत डोळस उपस्थित होते.
पालखी स्वागतास माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्ण्वीदेवी मोहिते पाटील, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. सुमेध अणदूरकर, उपविभागीय अधिकारी शमाढोक-पवार, तहसिलदार बाई माने यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व अकलूजचे ग्रामस्थ उपस्थ्िात होते.
अकलूज गांधी चौकात अकलूज ग्रामपंचायतीच्यावतीने खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. या नंतर पालखी सोहळा अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला. या ठिकाणी जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण संपन्न झाले.
माने महाविद्यालयाच्या प्रांगणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील जिल्ह्यातील पाहिले गोल रिंगण झाले. अश्व रिंगणात धावण्याचा नेत्रदीपक क्षण वारकरी, भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. तत्पूर्वी रिंगणात प्रथम पताका, हांडे-तुळशी, टाळ-मृदंग, विणेकरी यांचे रिंगण झाले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन केल्यानंतर अश्व रिंगणी धावले.
रिंगण सोहळ्यासाठी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जयसिंह मोहिते-पाटील, मान्यवर पदाधिकारी व मोहिते-पाटील कुटुंबीय उपस्थित होते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com