👁 7 Views

स्वेरीच्या संशोधन विभागामार्फत बियाणे व कृषी औजारे यांच्या प्रदर्शन व विक्रीला प्रचंड गर्दी

पंढरपूर LIVE 22 July 2018

 पंढरपूर-स्वेरी, भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई, बायफ पुणे आणि एम.के.सी.एल. नॉलेज फौडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिलेज विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध ग्रामीण व कृषी तंत्रज्ञान यांचे प्रदर्शन व विक्रीला  वारकरी व ग्रामस्थ अभूतपूर्व प्रतिसाद देत आहेत.  
          स्वेरीच्या संशोधन विभागातून मागील चार वर्षापासून भाभा अणुसंशोधन केंद्र, बायफ आणि एम.के.सी.एल. नॉलेज फौडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर येथे आषाढी वारी दरम्यान ग्रामीण व कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन दरवर्षी राबविले जाते. या प्रदर्शनाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये तंत्रज्ञान आधारित विकास गंगा गावागावांपर्यंत पोहचावी व गावातील व शहरामधील अंतर पडत असलेली दरी कमी व्हावी या हेतून हा उपक्रम भारताचे जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, शास्त्रज्ञ डॉ. अजित पाटणकर, डॉ. सुरी, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रीकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे व एम.के.सी.एल. नॉलेज फौडेशनचे संचालक विवेक सावंत, अधिकारी उदय पंचपोर यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली देशभर राबविले जात आहे. या प्रदर्शन व विक्री उपक्रमात नवनवीन  तंत्रज्ञानाद्वारे विकसित बियाणे, विविध कृषी साहित्य व कृषी औजारे हे पाहण्यासाठी वारकरी, शेतकरी व ग्रामस्थ गर्दी करत आहेत. या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी प्रास्तविकात स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी संशोधन विभागाची पार्श्वभूमी सांगून शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधा, बियाणे, औजारे, माती परीक्षण संच, पाणी परीक्षण, अनार दाणा, शेंगदाणे बियाणे यासंबंधी माहिती दिली. प्रदर्शन व विक्रीमध्ये माती परीक्षण किट, सोलार ड्रायर, तुळशी चहा, रोपे पेरणी यंत्र, जल शुद्धीकरण संयंत्र असे विविध प्रकारचे तंत्रज्ञान प्रदर्शनात मांडल्या असून याची माहिती प्रकल्प कार्यकारी अधिकारी गजेंद्र कुलकर्णी देत आहेत. बायफ फौडेशन पुणे याद्वारे कृत्रिम रेतनच्या साह्याने कालवड ९० टक्के गाबन धरते. या नवीन तंत्रज्ञानाला शेतकरी प्रतिसाद देत आहेत. प्रदर्शन व विक्रीच्या उदघाटनप्रसंगी सरपंच सौ. विजया जगताप, उपसरपंच सौ. उज्वला बनसोडे, दिलीप गुरव, स्वेरीचे प्राध्यापक वर्ग यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी उपस्थित होते.तसेच बायफचे प्रतिनिधी सतीश डोरले प्रदर्शनात शेतकरी व वारकऱ्यांना  माहिती देत आहेत.  

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *