👁 7 Views

वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून गोपाळपूर येथील अक्षय केसकर ने फुलवले एडसग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावरती हसु..! एडस्ग्रस्त बालकांसाठी आधारवड बनलेल्या पालवीतील चिमुकल्यांसोबत साजरा केला स्वत:चा वाढदिवस…

पंढरपूर LIVE 30 July 2018

पालवीच्या चिमुकल्यांसोबत साजरा केला अनोखा वाढदिवस..गोपाळपूर येथील अक्षय केसकर यांचा तरुणाईला मोलाचा संदेश

पंढरपूर (प्रतिनिधी):- प्रभा-हिरा प्रतिष्ठान येथे आज एक आगळा-वेगळा वाढदिवस साजरा झाला. कोणताही डामडौल व भपकेबाजपणा न करता समाजाचं ॠण फेडण्याचा संकल्प करत गेल्या कांही वर्षांपासून स्वत:चा वाढदिवस ‘पालवी’ तील चिमुकल्यांना खाऊ देऊन त्यांच्यासोबतीत रमत साजरा करणार्‍या गोपाळपूर येथील अक्षय केसकर यांनी आपल्या कृतीद्वारे तरुणाईला एक खुप मोलाचा संदेश दिलाय.
अवश्य बघा पंढरपूर लाईव्हचा हा स्पेशल व्हिडीओ रिपार्ट


हल्ली वाढदिवसाच्या दिवशी डॉल्बीच्या तालावर नशेच्या धुंदीत थिरकणारी तरुण पिढी एका वेगळ्याच कैफात जगताना आढळून येत असते. परंतु गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील अक्षय केसकर हे याला अपवाद ठरलेत. गेल्या अनेक वर्षापासून ते स्वत:च्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन प्रभा-हिरा प्रतिष्ठान कोर्टी येथील एच.आय.व्ही. ग्रस्त बालकांचे लालन-पालन करणार्‍या ‘पालवी’ या सामाजिक संस्थेला यथाशक्ती मदत करुन व येथील मुलांना खाऊ वाटप करुन कांही क्षण या मुलांसोबत रमतात. आजही त्यांनी आपल्या 25 व्या वाढदिवसादिवशी आपल्या समविचारी मित्रांना सोबत घेऊन ‘पालवी’तील चिमुकल्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. 
आज दुपारी ‘पालवी’ मधील मुलांना मिष्ठान्न वाटप केल्यानंतर येथील एका चिमुकलीने अक्षय केसकर यांचं औक्षण केलं. सर्व मुलांनी एका आवाजात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर केसकर व त्यांच्या मित्रांनी पालवी संस्थेतील मुलांनी बनविलेल्या विविध वस्तुंची पाहणी केली. संस्थेचे व्यवस्थापन व संस्थेला आणखी कांही सहकार्य करता येईल का? याची माहिती घेतली. यावेळी ‘पालवी’ मधील चिमुकल्या बाळांना पाहून सर्वांची मनं भरुन आली. सर्वांनीच ‘पालवी’ ला शक्य ती मदत करण्याचा संकल्पही यावेळी केला. यावेळी बोलताना व्यंकटेश मुळे म्हणाले की, ‘‘आमचे मित्र केसकर यांनी आज स्वत:च्या वाढदिवसानिमित्त आम्हाला ‘पालवी’ संस्थेत आणले आणि आम्ही सारे गहिवरुन गेलो. माणसातील माणुसकीचं खरं दर्शन आणि परमेश्‍वराचं वास्तव्य इथं असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. आम्हाला समाजसेवेची एक नवी दृष्टी इथं आल्यावर भेटली. तरुण-तरुणींनी आपल्या वाढदिवसादिवशी अशा प्रकारे समाजसेवा करण्याची संकल्पना खरंच महान आहे. सर्वांनी याचा अंगीकार करावा. ‘पालवी’ तील मुलांच्या चेहर्‍यावर आम्ही आल्यानंतर फुललेलं हास्य पाहिलं तेंव्हा इथं वारंवार यावं आणि या मुलांच्या सुख-दु:खात रमावं अशी भावना निर्माण झाली. ’’
यावेळी माऊली चव्हाण, व्यंकटेश मुळे, रविराज केसकर, सागर दुपडे, युवराज मुळे, भुषण माने, हेमंत साळुंखे, किरण मुळे, अवधुत मुळे आदींसह मुळे मित्र परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. 
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *