👁 5 Views

पंढरपुर सिंहगडची प्लेसमेंट मध्येगरुड झेप..चालू शैक्षणिक वर्षात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची जगातील नामांकित कंपनीत निवड

पंढरपूर LIVE 31 July 2018

चालू शैक्षणिक वर्षात ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची जगातील नामांकित कंपनीत निवड

   पंढरपुर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी पंढरपुर सिंहगड महाविद्यालय नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात सर्वात पुढे असुन पंढरपुर सिंहगड महाविद्यालयातील चालू शैक्षणिक वर्षामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची जगातील नामवंत कंपनीत निवड झाली असुन विद्यार्थ्यांना नोकरी देऊन स्वत:च्या हिमतीवर यशस्वी इंजिनिअर घडविण्याचे काम पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय करत आहे.महाविद्यालयाने प्लेसमेंट मध्ये गरुड झेप घेतली असून यापुढील काळात विद्यार्थ्यांना जगातील आंतरराष्ट्रीय नामंकित कंपन्यामध्ये विद्यार्थ्याचे प्लेसमेंट होण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
   एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपुर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व  जगात नामवंत असलेल्या सीमेन्स, असेंन्चर, रोबस्टर अॅटोमेशन, वुमास, ञिवेणी टर्बाईन, एपीआरजी टेक्नॉलॉजी प्रालि .,कोज्या टेक्नॉलॉजीस  प्रालिं., इमिटेक इमिशियन कंन्ट्रोल टेक्नॉलॉजीस् इंडिया प्रा. लि., एसपीएम अॅटोकॉम्स सिस्टीमस् प्रा. लि., श्री एसएम.आवताडे प्रालि., जस्ट डाईल, महाबळ इंडस्ट्रीज, ध्रुव कन्सलटंन्सी प्रालि.,जेनेक्स्ट वेब सोलुशनस प्रालि., के पे-लेक्स इंडिया प्रालि ., डी वाय पॉवर इंडिया, एमईपी, ट्रिनिटी अॅटो, झेड एफ स्टेरिंग इंडिया लि., फोरटेक प्रेसिजन पुणे, पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीस पुणे, सोवा सोलर लि., स्पीड टेकसर्व्ह प्रालि, अॅकेड सॉफ्टवेअर सोलुशनस, अॅमेझॉन, आर एस के क्रेन्स, स्पार्टन टेक्नॉलॉजीस प्रालि., स्ट्रान्स कोड टेक्नॉलॉजीस प्रा. लि., विनय इंडस्ट्रीज, जिनियस सिस्टीमस, अरूणा इलेक्ट्रिकल्स, कंन्सल्ट नुऑल्ट पॉवरसोलुशन, दाब टेक्नॉलॉजीज प्रा.  लि., एक्पोनशिया, गेटट्युटर इनफोएज प्रा.लि., जी आर पॉवर पॉवर स्टील इंडिया प्रा. लि, आय डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इंपेरीयल सोसायटी ऑफ इनोव्हेटीव इंजिनियरस आदीसह विविध नामांकित कंपन्यात पंढरपुर सिंहगडच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे निवड झाली असुन ही निवड प्रक्रिया सिंहगड महाविद्यालय पंढरपुर येथे घेण्यात आली.
     विद्यार्थ्यांचे कौशल्य व ज्ञान पाहून पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींगसिव्हिल इंजिनिअरींग,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगइलेक्ट्रिकल इंजिनिअरींग,कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग या शाखेतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्लेसमेंटच्या बाबतीत पंढरपुर सिंहगड सर्वात पुढे असुन अगदी कमी कालावधीत सिंहगड कॉलेज मधील जास्तीत जास्त विद्यार्थी निवडण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या येत आहेत. प्रत्येक वर्षी प्लेसमेंटची टक्केवारी वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नव-नवीन नामांकित  कंपनीत काम करण्याची संधी प्राप्त होत आहे 
    औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून विकास झाल्यामुळे तसेच महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग असल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय व नामांकित कंपनीत विद्यार्थी प्लेसमेंट झाले आहेत. महाविद्यालयाला विविध कंपन्या भेटी देत असून त्यातुन विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत आहे.
      सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून अभ्यासपुर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम तज्ञ प्राध्यापक करीत असल्यामुळे सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विविध कंपनीत निवडला जात आहे. प्लेसमेंट मधुन आजपर्यत ८०० हून अधिक विद्यार्थी आज जगातील नामवंत क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीत पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थी नोकरी करून स्वतःचे करिअर घडवित आहे. एस् के एन् सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालय अभियांत्रिकी शिक्षणासाठी नावाजलेले कॉलेज आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले.          
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *