👁 6 Views

गणेशोत्सवात श्रीमंत दगडुशेठ गणपती ट्रस्ट साकारणार श्री राजराजेश्वर मंदिर

पंढरपूर LIVE 2 आॅगस्ट  2018


https://youtu.be/UZUxEBP5_ck

‘दगडूशेठ’च्या राजराजेश्वर मंदिर सजावटीच्या वासापूजनाचा श्रीगणेशा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; पालकमंत्री गिरीष बापट यांची उपस्थिती
पुणे :  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवात तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन बुधवार पेठेतील सजावट स्थळी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले. जय गणेश आणि मंत्रपठणाच्या जयघोषात ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांनी यंदाच्या सजावटीच्या तयारीचा श्रीगणेशा केला. 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, अंकुश काकडे, शिल्पकार विवेक खटावकर, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते, उल्हास भट, विकास काळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 
अशोक गोडसे म्हणाले, सलग ७५ वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. तब्बल १२०० ते १६०० वर्षांपूर्वी असलेल्या मंदिराच्या स्थापत्यकलेचा उत्कष्ट नमुना भाविकांसमोर आणण्याचा सजावटीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. यंदा श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मुख्य सभामंडप आणि गाभारा वैशिष्टयपूर्ण असणार आहे. गाभा-यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिद्धटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत. 
ते पुढे म्हणाले, श्री राजराजेश्वर मंदिराला तमीळ भाषेमध्ये बृहदेश्वर मंदिर किंवा बृहदीश्वर मंदिर असे म्हटले जाते. चोल राजवटीतील राजे राजराज चोल यांनी या मंदिराची निर्मीती केली असल्याने राजराजेश्वर मंदिर या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर १३ मजली असून ६६ मीटर उंचीचे आहे. वास्तुकला, पाषाण आणि ताम्र शिल्पांकन, चित्रांकन, नृत्य, संगीत, आभूषण या कलांचे भांडार असा लौकिक असलेल्या या मंदिरामध्ये संस्कृत आणि तमीळ पुरालेखांचा अनोखा संगम आहे. या मंदिराची प्रतिकृती यंदा ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार आहे. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *