👁 8 Views

डॉ. विकास कदम यांना सोलापूर विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट  2018

पंढरपूर: रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील  महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील डॉ. विकास कदम यांना सोलापूर विद्यापीठाचा ग्रामीण विभागाचा शैक्षणिक वर्ष २०१८ चा आदर्श शिक्षक पुरस्कार

देऊन सोलापूर येथे सन्मानित करण्यार आले. हा पुरस्कार १ ऑगस्ट २०१८ रोजी सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनात सोलापूरच्या महापौर सौ. शोभा बनशेट्टी व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमास सोलापूर विद्यापीठाचे पदाधिकारी व अधिष्ठाता, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
महिला महाविद्यालय, सोलापूरचे प्राचार्य डॉ. डी. जे. साळुंखे आदी मान्यवरउपस्थित होते. डॉ. विकास कदम रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते विद्यापीठाच्या निरनिराळ्या प्राधिकरणावर कार्यरत आहेत.  त्यांची पस्तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.


त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली आहे.
यु.जी.सी. तीन मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध
पत्रिकेत पंचेचाळीस शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. महविद्यालयाच्या दृष्टीने ही
अभिमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे, कला
विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.
एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, स्टाफ वेलफेर
समितीचे चेअरमन डॉ. बी. बी. शितोळे, शिक्षक-शिक्षेकेतर सेवक, विद्यार्थी आणि
पंढरपुरातील रयत प्रेमी नागरिक यांनी अभिनंदन केले. पुढील कार्यासाठी शुभेच्छा
दिल्या आहेत.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *