👁 5 Views

पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शरद यादव ला शिष्यवृत्ती

पंढरपूर: प्रतिनिधी

करकंब (ता.पंढरपूर) येथील शरद नारायण यादव या विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आर्थिक अडचण लक्षात घेऊन “पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २५ हजार रूपयांचा चेक खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते शरद यादव या विद्यार्थ्यांला देण्यात आला आहे.



ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थितीने शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन पवार चॅरिटेबल ट्रस्ट एक सामाजिक बांधिलकीतून गरजू व होतकरू तसेच हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करीत असते. 


   शरद यादव हा सध्या कोर्टी (ता.पंढरपूर) एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असुन घरची आर्थिक परिस्थिती हलक्या असुन इंजिनिअरिंगच्या पुढील शिक्षणासाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून २५ हजाराचा धनादेश देण्यात आला आहे.


   पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील शरद यादव या विद्यार्थ्यांला पवार चॅरिटेबल ट्रस्टकडून इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत प्राप्त झाल्यानंतर काॅलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी खासदार सुप्रिया पवार व पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे आभार व्यक्त केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *