👁 7 Views

भुवैकुंठ पंढरी नगरी कधीच बंद ठेवु नये यासाठी 16 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन-आ.भारत भालके

पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट  2018

आंदोलना दरम्यान ज्यांनी कोणी दगडफेकी सारख्या घटना केली असेल,त्यांच्यावर शासनाने योग्य ती कारवाई करावी परंतु आंदोलकांवर कुणाच्या दबावाखाली  गुन्हे दाखल कराल तर उद्रेक होईल! आ. भारत भालके यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती. बघा सविस्तर व्हिडीओ रिपोर्ट फक्त पंढरपूर लाईव्ह वर.



पंढरपूर -भुवैकुंठ पंढरी नगरी ही महाराष्ट्राची अध्यात्मीक राजधानी आहे. त्यामुळे येथे आलेल्या भाविकांना, येथील व्यापार्‍यांना व सामान्य पंढरपूरकरांना कोणताही त्रास होऊ नये. यासाठी पंढरीतील व्यापारी, सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी येत्या 16 ऑगस्ट रोजी येथील तनपुरे महाराज मठामध्ये 4 वाजता बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती आ. भालके यांनी दिली. 


या बैठकीस आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी, सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक, प्रांताधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होईल. आदींसह शहरातील विविध सामाजिक संघटना, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक, व व्यापारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 


याच बरोबर पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नये अन्यथा जनतेतून उद्रेक होईल. आंदोलना दरम्यान ज्यांनी कोणी दगडफेकी सारख्या घटना केली असेल,त्यांच्यावर शासनाने योग्य ती कारवाई करावी,परंतु कोणाच्या सांगण्यावरून पोलिस प्रशासनांकडून चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होत असेल तर हे चुकीचे आहे.  असेही ते म्हणाले. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *