👁 6 Views

वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलौट गर्दी…हर हर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय, जय भोलेनाथाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला

पंढरपूर LIVE 14 आॅगस्ट  2018

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन भाविकांनी घेतले. भाविकांनी मंदिर परिसरात हर हर महादेव शंभू महाराज की जय असा शिवनामाचा जयघोष करीत देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हजारो भाविकांना  श्रावणातील  सोमवार असल्याने भाविकांची गर्दी मोठी होती. मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच यावर्षी पावसाचे प्रमाणे कमी असल्याचे हे भोलेनाथा पाऊस कधी पडणार अशी विनवनी शेतकरी भाविक करीत आहेत.  
 पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली. दुपारी १ पर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी वैदनाथाचे दर्शन घेतले आहे. ‘हर हर महादेव’ चा जयघोष करीत भाविकांची रविवारी रात्रीपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात रीघ लागली होती. 
दर्शन सुलभ व्हावे यासाठी संस्थानाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर लोखंडी बॅरीकेटिंग लावून महिलांसाठी वेगळ्या रांगांची खास सोय करण्यात आली आहे. सकाळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार आर.टी. देशमुख यांनी तर दुपारी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले. 
यासोबतच येथे वैद्यनाथ मंदिर ट्रस्ट, लिंगायत समाज व भाविकांच्यावतीने राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा श्रावणमास तपोनुष्ठान सोहळासुद्धा सुरु आहे. यासाठीही भाविकांचे मोठ्या प्रमाणावर शहरात आगमन होत आहे. अनुष्ठानाच्या पहिल्याच दिवशी श्रावण महिना सुरु होत असल्याने भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. 
  मंदिर परिसरात २०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक डि.के.शेळके,उमाशंकर कस्तुरे व देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांची उपस्थिती होती
बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गजुरात आदी भागांतून भाविक दाखल झाले आहेत. गंगेचे पाणी कावडीने पायी परळीला आणून वैद्यनाथाला अभिषेक करण्यासाठी आलेल्या भाविकांना दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, भाविकांना दर्शनासाठी अडचण होऊ नये म्हणून वैद्यनाथ देवस्थानच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या पाश्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
तालुक्यातील महादेवाचे मंदिरात शिवभक्तांची आलोट दर्शनासाठी रांगाच रांग
श्रावण महिन्यातील सोमवारी सर्वत्र शिवालय भक्तांनी गजबजून गेले होते. तालुक्यातील मालेवाडीचे अंधारेश्‍वर, जिरेवाडीचे सोमेश्‍वर, तपोवनचे रामेश्‍वर, सोनहिवरा महादेव मंदिरात, टोकवाडीचे रत्नेश्‍वर, धर्मापुरीचे मल्लिकार्जुन, कासारवाडीचे केदारेश्‍वर, अशी ग्रामीण भागातील शिवालयांमध्येही भक्तांनी दिवसभर गर्दी केल्याचे दिसत होते. परळी शहरातील संत जगमित्र, गुरूलिंग स्वामी मंदिर, सुर्वेश्‍वर मंदिरासह शहराच्या विविध महादेव मंदिरांत भक्तांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत होते.
मंदिर परिसरात बेल-फुलांच्या दुकानावर भाविकांची गर्दी
महादेवाला बेल अधिक आवडत असल्याने आज बेल-फुलांना प्रचंड मागणी होती. वैद्यनाथ मंदिराकडे जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर बेलाची पाने घेऊन विकण्यासाठी महिला, मुले, मुली आणि पुरुषही थांबले होते. केवळ बेल-फुलांवर लाखोंची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *