👁 4 Views

आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये अनोख्या पध्दतीने स्वातंत्र्यदिन साजरा… विद्यार्थ्यांना टांग्यातून शाळेत ने-आण करणारे नजीरकाकांना ध्वजारोहणाचा सन्मान

पंढरपूर LIVE 16 आॅगस्ट  2018

पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालयात अनोख्या पध्दतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. गेली 55 वर्षे शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या टांग्यातून सुखरुप आणि काळजीपूर्वक ने-आण करणारे निष्ठावंत टांगेवालेे नजीर हकीम यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव सतीश पुरंदरे, सदस्या प्रतिभा कुलकर्णी, रेखाताई उंबरकर, सदस्य डॉ. अनिल जोशी, अ‍ॅड. ज्ञानेश आराध्ये आणि मंदार केसकर आदी उपस्थित होते. 


राष्ट्रगीतानंतर ध्वजगीत, प्रतिज्ञा झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली.यावेळी विविध सांस्कृतीक कार्यक्रमासोबतच यावेळी पांडुरंग ट्रॅव्हलसच्या कवडे कुटूंबियांनी आईच्या सन्मानार्थ ग्रंथतुला करुन शाळेच्या वाचनालयास पुस्तके भेट दिली. समारोप गीतानंतर खाऊ वाटप करण्यात आले. सुत्रसंचालन सौ. कोळी, सौ. केसकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.   

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *