👁 7 Views

आटपाडी न्यायालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण

पंढरपूर LIVE 17 आॅगस्ट  2018आटपाडी न्यायालयाच्या परिसरात ” वृक्षारोपण करा आणि पर्यावरणाचे रक्षण करा”  हा संदेश देत वृक्षारोपण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. 

आटपाडी वकील संघटना आणि आटपाडी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गुलमोहर , पिंपळ वड, चिंच, निलगिरी, आवळा, जांभूळ ,उंबर अशा विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले .
आटपाडी  येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ, स्तर  श्री. ए.एन. माने  यांचे हस्ते प्रथम ध्वजारोहण करण्यात आले. व त्यानंतर आटपाडी न्यायालयाच्या इमारतीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
 सदर कार्यक्रमास  दिवाणी  न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर आटपाडी चे मा. ए.एन. माने तसेच  सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, मा. जे.आर. घाडगे तसेच  वकील संघटना आटपाडीचे एडवोकेट एन.एन. निचळ, उपाअध्यक्ष  अँड. एस .आर. कदम ,  सचिव ॲड. व्ही. पी. देशमुख सहसचिव अँड.ए.जे. कुलकर्णी  हे हजर होते .
तसेच या प्रसंगी वनपाल श्री. पी. बी. बालटे , वनरक्षक अशोक कोपरकर यांनी त्यांचेकडील वनकर्मचारी यांचेसह उपस्थित राहून वृक्षारोपणा बाबत मदत आणि मार्गदर्शन केले . 
वृक्षारोपण प्रसंगी अडवोकेट सी.पी.शेलार, आर. बी. कुलकर्णी, व्ही .बी .पाटील, आर. आर. नागणे ,एस. व्ही. दाणी, एस .व्ही .लाळे, सी.व्ही. जाधव ,व्ही. बी .सावंत, के .डी. भिंगे, ए. बी. भोसले, डी .एस .पाटील, ए. एम. अत्तार , ए .डी .वसेकर, आर. आर. इनामदार, एस. व्ही. पाठक, आर .व्ही. कुलकर्णी, एस. डी. सातपुते, पी .जी. शिंदे, व्ही. व्ही .पाटील, बी.पी. देशमुख ,एन .एम. दबडे, एन .आय. पटेल इत्यादी बहुसंख्य वकील वर्ग उपस्थित होते. तसेच न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक जे .एस. भंडारी , एम. एम. पवार व सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे व्यवस्थापन व आभार न्यायालयीन कर्मचारी ये एस घाडगे वरिष्ठ लिपिक यांनी पाहिले.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *