👁 9 Views

पुण्यातील पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

पंढरपूर LIVE 18 आॅगस्ट  2018

पुणे येथे होत असलेल्या पावसाचा फायदा उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी झाला असून दोनच दिवसात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उजनी धरण पाणी पातळी

दि : 18/08/18 सकाळी 6.00 वा

पाणी पातळी  : 494.205

एकूण साठा   : 2531.81

उपयुक्त साठा : + 729.00

टक्केवारी     : + 48.05 %

दौंड विसर्ग :  33,876 क्युसे

बंडगार्डन विसर्ग:-

बोगदा:-900क्युसे

कालवा:-3250क्यु

नदी : बंद 

सिना-माढा:- चालू 200

पाऊस    :   मी. मी.

प .आ .अखेर: 292  मी. मी.

पुणे येथे देखील दोन दिवसामध्ये वडीवळे प्रकल्पावर तब्बल 121 मिमी पाउस झाला तर उजनी धरणावर केवळ 8 मिमी पाउस झाला आहे. मात्र पुण्याच्या पावसाने उजनी दोन दिवसामध्ये चांगलेच वधारलेले दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून उजनी धरणाची पाण्याची पातळी स्थिर होती. यामध्ये सामान्यतः पुणे येथील प्रकल्पामधून येणारे पाणी आणि उजनीमधून कालव्याला सोडले जाणारे पाणी समान होते. यामध्ये 14 ऑगस्टपासून पुणे येथे पावसाने मोठी हजेरी लावण्यास सुरूवात केली. यामध्येच 33 टक्यांवर असणारे उजनी धरण  तब्बल 44 टक्क्यांपर्यत येऊन पोहोचले. गेल्या दोन ते तीन दिवसाच्या काळामध्ये उजनी धरणावर केवळ 8 मिमी पाऊस झाला तर भीमा खो-यातील वडीवळे प्रकल्पावर सर्वाधिक 121 मिमी पाउस झाल्यांची नोंद आहे. तर कलमोडी प्रकल्पावर 44 मिमी नोंद झाली आहे. निश्चितच पुणे येथील प्रकल्पाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी हे उजनीला येउन मिळाले आहे.

 याशिवाय वीर धरणातून सध्या 13 हजार क्युसेकने उजनी धरणामधे पाणी येत आहे. त्यामुळे निश्चितच उजनीची पाणी पातळी वधारत आहे. याशिवाय खडकवासला तसेच पुणे जिल्हयातील अर्थात भीमा खो-यातील अन्य प्रकल्पातील पाणी देखिल दौंडमार्गे पुढे उजनीला येऊन मिळत आहे. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *