👁 8 Views

9वर्ष झाली!शेतकऱ्याचा पुतळा कधी बसवणार याची चबुतरा बघतोय वाट.

पंढरपूर LIVE 26 आॅगस्ट  2018

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)शहरातील तहसिल कार्यालयाच्या आवारात छानसा शेतकऱ्याचा पुतळा प्रशासकिय इमारतीचे बांधकामावेळी बसविण्यात आला होता.कालातंराने नविन पुतळा बसविण्याचे आश्वासन देवुन सदर पुतळा काढण्यात आला याला 8 ते 9 वर्ष झाली तरी शेतकऱ्याचा पुतळा बसविण्यात आला नसुन पुतळा कधी बसवला जाणार हे प्रशासनाकडुन ठोस असे कधीच सांगण्यात आलेले नसुन शेतकऱ्याचा पुतळा ज्या ओट्यावर पुर्वी होता तोच ओटा नविन पुतळा बसवल्या जाण्याची
तहसिल कार्यालयाच्या आवारात  
 9 वर्षापासुन वाट पहात इमानदारीने उभा अाहे.
या विषयीची इत्तभुत माहिती अशी की तहसिल कार्यालयाच्या आतील आवारात
इमारतीचे बांधकामावेळी प्लाँस्टर आँफ पेरिसचा सुंदर असा नांगरधारी शेतकऱ्याचा पुतळा बसवला होता.
कालांतराने वातावरणामुळे पुतळ्याचे हात व पायाचे प्लाँस्टर आँफ पेरिस गळुन
पडल्याने पुतळा विद्रुप दिसु लागल्याने तहसिल प्रशासनाने सदरिल पुतळा काढून टाकला होता व नविन पुतळा बसवु असे आश्वासन दिले होते.
अनेक दिवस उलटुन गेले तरी प्रशासनाकडुन पुतळा पुतळा बसविण्याच्या काही हालचाली होत नसल्याने  पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी एकदा
शेतकऱ्याची वेशभुषा करून आंदोलन झाले होते तर तीन वेळेस उपोषण,एकदा परळी ते बीड पायी जावुन सेवानिव्रत जिल्हाधिकारी मा.ससाणे साहेबांना
 मागणीचे निवेदन देण्यात आले होते.येवढे करूनही पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे हे 15आँगष्टच्या झेडां वंदनास परळी तहसिल कार्यालयात आले असता झेडांवदन व राष्ट्रगित झाल्यावर शेतकऱ्याचा पुतळा बसवा अश्या घोषणा देवुन त्यांचे लक्ष वेधले होते
तेंव्हा ना.धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतिने सदर
पुतळा बसवु व तसी परवानगी प्रशासनाने
द्यावी असे तत्कालीन उपविभागीय अधिकारी चौधर मँडम यांना सुचविले होते हा विषय होवुन सुध्दा दोन वर्ष झाली तरी मात्र जिल्हाप्रशासनाने नाथप्रतिष्ठानला पुतळा 
बसविण्याची परवानगी दिली नाही व प्रश्र
तसाच लटकत पडला आहे.एखाद्या सेवाभावी संस्थेला प्रशासकिय इमारतीत किंवा आवारात काही सुधारणा अथवा एखादे काम करू देण्यास कायदेशिर अडचन येत असेल तर जिल्हाप्रशासनाने

जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या कानावर हा विषय टाकुन प्रशासकिय खर्चाने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचा नविन पुतळा परळीच्या तहसिल कार्यालयाच्या आवारात बसवावा व नेहमी या विषयावर होणारे आंदोलन ,उपोषणाचा गांभिर्याने विचार करून प्रश्र मार्गी लावावा अशी मागणी  तालुक्यातील शेतकरीवर्गातुन व जनतेतुन होत आहे.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *