पंढरपूर LIVE 2 सप्टेंबर 2018
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दर्शन पास घोटाळ्यात आणखी सदस्य, अधिकारी व कर्मचारी दोषी असण्याची शक्यता आहे. त्यांची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करा. घोटाळे करणारांची समितीवरून हकालपट्टी करा…!अन्यथा संपूर्ण मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करू…!! असा इशारा
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण समितीने दिला आहे.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे बनावट व्हीआयपी दर्शन पास द्वारे भाविकांकडून पैसे घेऊन दर्शन घडविणाऱ्या एजंटवर व एका मंदिर समिती सदस्यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर पत्रकार भवनमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भुमिका पत्रकारांशी बोलताना मांडली.
ज्याप्रमाणे पैसे घेऊन दर्शन घडविणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल झाला त्याचप्रमाणे पैसे देऊन अनधिकृत रित्या दर्शनाचा प्रयत्न करणाऱ्या भाविकावर देखील गुन्हा दाखल करावा. नुतन मंदिर समिती स्थापन झाल्यापासून मंदिर समितीचा कारभार पारदर्शक व सुधारित होण्याऐवजी दररोज वेगवेगळ्या प्रकारचे गैरव्यवहार सातत्याने उघडकीस येत आहेत. यामुळे संपूर्ण देशात पंढरीचे नाव बदनाम होत असल्याने विठ्ठल भक्त व वारकरी सांप्रदायामध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.
मंदिर समिती अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले यांच्यासह वारकरी प्रतिनिधींनाही इशारा देत आहोत की, पैसे भरून व्हीआयपी दर्शन देणार्या व्यवस्थेचा संपूर्ण पर्दाफाश करून संबंधित सदस्य तसेच आणखी कोण कोण सदस्य, अधिकारी, कर्मचारी व व्यवस्थापन यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा संपूर्ण मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करू…!! अशी माहिती श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण समितीचे सचिव गणेश लंके, प्रवक्ता रामकृष्ण वीर, सदस्य रविंद्र साळे, ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, कबीर महाराज, शाम महाराज उखळीकर यांनी दिलीय.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com