👁 7 Views

पंढरपूर: धक्कादायक! सोन्याच्या डब्ब्यावरून दोन जावांमध्ये जुंपली , वाद विकोपाला जाऊन नवविवाहितेची हत्या

 

पंढरपूर येथून काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका विवाहितेला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील एका गावात घडली आहे.

यामध्ये पीडित नवविवाहितेचा मृत्यू झाला आहे. परिसरात या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यामधील अंजनगाव उमाटे येथील एका तरुणाबरोबर दोन महिन्यांपूर्वी पीडितेचा विवाह झाला होता.शुक्रवारी पीडितेचे जाऊबाईबोरबर भांडण झाले होते. कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या डब्ब्यावरून हा वाद झाला होता. त्यामुळे नवविवाहितेची जाऊबाईने हत्या केल्याचा संशय प्राथमिक तपासात पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.


सिन्नर येथून देखील आज एक हत्येची घटना समोर आली आहे. सिन्नर येथे नाशिक- पुणे महामार्गावरील धोंडवीरनगर शिवारात रस्त्याच्या कडेला गोंदे येथील संपत नामक तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. ही हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले. वडीलांचे अपहरण केल्‍याच्‍या कारणावरून ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


पोलीस तपासात अज्ञात इसमांनी तलवारीने शरीरावर वार करत हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. तर घटनास्थळी थोड्या अंतरावर एक तलवारीचे पाते आणि मोटारसायकल आढळून आली आहे. त्यानुसार पोलिसांनी या घटनेचा कसून तपास घेतला असता घटनेतील संशयित प्रवीण चांगदेव तांबे याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *