👁 5 Views

उपजिल्हा रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध करण्याची निवेदनाद्वारे मागणी आधार नोंदणी केंद्र सुुरु करण्याची गरज – नगरसेेवक डि.राज सर्वगोड

Pandharpur Live 19 September 2018

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात येथे येणार्‍या रुग्णांच्या हिताच्या द्रष्टीने येेथे कायस्वरुपी आधार नोंदणी केंद्रासह विविध मागण्यांची पुर्तता करण्यात यावी यासह नगरसेवक डि.राज सर्वगोड यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक जयश्री ढवळे यांना निवेदन दिले आहे.या बाबत तातडीने सकारात्म निर्णय घेण्यात येवून रुग्णांची गैरसोय थांबविली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
              या बाबत अधिक माहिती देताना नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की, आज काल कोणत्याही शासकिय कामासाठी अबालवृध्दांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.लहान बालकांना आधार नोंदणीसाठी घेवून जाणे म्हणजे पालकांच्या द्रष्टीने मोठे दिव्यच असते. ही गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी सदर केंद्र सुरु करावे,येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.तरीही येथे येणारे अनेक रुग्ण अधिकच्या उपचारासाठी म्हणून सोलापूर येथे अथवा पंढरपूरातील खाजगी रुग्णालयात पाठविण्याचे प्रकार सर्रास घडतात त्यास प्रतिबंध करावा.
रुग्णास रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात यावी.व मोफत रुग्णवाहीका सेवेबाबत सविस्तर माहीती देण्यात यावी.आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावाा व रुग्णांना ते तात्काळ उपलब्ध करुन द्यावीत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचीॅ माहीती देण्यासाठी पुर्णवेळ आरोग्यमित्र उपलब्ध करुन सखोल माहीती देण्यात यावी.स्वच्छता,आहार व धुलाई आदी सेवा अनियमित असून या बाबत संबधीत ठेकेदारांच्या मनमानीवर अंकुश ठेवावा.जन्म मृत्युची नोंद नगर पालीका प्रशासनाकडे 21 दिवसात देणे बंधनकारक त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या रित्क जागा तातडीने भरण्यात याव्यात.या ठिकाणी धुळघात पडलेली अद्यावत वैद्यकिय यंत्रसामुग्री तातडीने दुरुस्त करुन वापरात आणावी आदी मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले असल्याची माहीती नगरसेवक डि.राज सर्वगोड यांनी दिली. 
      हे निवेदन देताना नगरसेवक सुरेश नेहतराव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल आर्वे,संतोष जाधव,सुरज पावले,सुरज जैस्वाल,आदम बागवान आदी उपस्थित होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *