👁 5 Views

*पत्रकारांनो कधीतरी स्वतःला वाचले पाहिजे?* *अख्ख्या जगाच्या सुरक्षेसाठी झटणारा पत्रकारच मागतोय*, *”कोन्ही संरक्षण देता की संरक्षण?”*

Pandharpur Live 21 September 2018

…………………………………
*पत्रकारांनो आपण सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहोत,हे ज्ञात ठेवा,पत्रकारांनो अधिकारी,पुढाऱ्यांच्या पुढेपुढे करण्यापेक्षा,हारतुरे घालण्यापेक्षा पत्रकार संरक्षण कायदा का रखडला?याचे चिंतन करा,खंडीभर संघटना,नेते यांना सक्रिय करा,लोकशाहीसाठी आपले योगदान त्याग विसरू नका,शासकीय कर्मचाऱ्यांना 353 कलमान्वये संरक्षण मात्र लोकशाहीची इनामे इतबारे सेवा करणारे पत्रकारांना आजपर्यंत सर्वच सरकारांनी अंगठा दाखवलाय*
   काल परवाची घटना रात्रीच्या वेळी एका पत्रकाराला बातमीसाठी चित्रीकरण करतांना अक्षरशा सरकारी कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली कॅमेरा,मोबाईळ हिसकून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले,अक्षरशा पत्रकारावर तू व्यसनी आहेस असे आरोप करून त्यास गुन्हेगाराप्रमाणे वागणूक मिळाली,दादाजी पगारे या पत्रकाराला माळेगावला तर अपघातात उडवून दिले,हात मोडला,कॅमेरा चालवू शकत नाही,पोलिसांना एफ आय आर दाखल करूनही अखेर न्याय मिळाला नाही,व्यसनमुक्तीचे कार्य करतो म्हणून मला मुंगसरा फाट्यावर गत वर्षी रात्री मागून उडवून दिले होते,हे असेच सुरू राहणार का?माळेगावला तर तहसीलदार म्हणतात तू दिसण्यावरून पत्रकार वाटत नाही,असे अवमान अपमान किती होणार?याला उत्तर देण्याऐवजी आपण अधिकारी नेत्यांची शेपूट धरतो का?अरे आपला अपघात झाला,घरात कोण्ही आजारी पडले,घराचे भाडे थकले,मुलांचे शिक्षण,आपल्याला कष्टाचे काय मिळते?पत्रकार ग्रामीण असो का शहरी आपले कार्य समाजात शांतता सुवयवस्था राहावी,समाजाचे शोषण थांबावे,चांगले वाईट समाजाला समजावे,सरकारचे डोळे उघडणे,हे आपले कर्तव्यच,बातमीसाठी आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, आपला उपचाराआभवी मृत्यू झाला,हे उदद्योग आपल्या मुळावर उठलेत, आपली प्रतिष्टा संपत चालली,याचे भय बाळगा,थोडी चिंता करा,अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आपली माती होणार?
               आपला::
*श्री.राम खुर्दळ.(राज्यउपाध्यक्ष)*
पत्रकार संरक्षण समिती.महाराष्ट्र.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *