👁 10 Views

साखर-विश्व प्रतिष्ठान – साखर क्षेत्रातील कामगार व शेतकरी वर्गासाठी एक अशेचा किरण*

पंढरपूर LIVE 10 ऑक्टोबर 2018




*साखर कामगार एक रुपयाच्या बचतीतुन साधु शकतात जीवनाचा उत्कर्ष – चारुदत्त देशपांडे*


*कराड :- सातारा जयवंत शुगर्स धावरवाडी येथे नुकतेच ”आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. राज्यातील प्रत्येक साखर कारखाना स्थळी जावून सामाजिक साखर विश्व प्रतिष्ठान च्या माध्यमातुन आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार या स्वयंस्फुर्तिने साखर कामगार व शेतकरी बांधवांचा कौटुंबिक भवितव्याचा उज्ज्वल विकास कसा साध्य करता येईल ही संकल्पना रुजविन्यसाठी सदर सामाजिक संस्थाचे राज्य स्तरीय सचिव अविनाश कुटे पाटील प्रत्येक साखर कारखान्यावर जावून जनप्रबोधन करीत आहेत. याचाच एक भाग म्हनुन जयवंत शुगर्स लि.धावरवाडी येथेही या संस्थेचे विश्वस्त मा. श्री चारुदत्त देशपांडे साहेब यांचे प्रेरनेतुन या परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.*


 यावेळी साखर विश्व प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सचिव अविनाश कुटे पाटील यांनी सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातुन साखर क्षेत्रातील साखर कामगार,अधिकारी व शेतकरी बांधवांनी जर त्यांच्या जीवनात दररोज 1रु.बचत केली तर त्यांच्या जीवनात स्वयंस्फूर्तीने कौटुबीक भवितव्यच्या दृष्टीकोनातुन खुप मोठा उत्कर्ष साधु शकतात.या विषयी विवेंचन केले.


साखर कामगार-शेतकरी महासाखर संम्मेलन,जिल्ह्यात एक साखर गांव निर्मितितुन शेतकरी वर्गास हमी भाव,कामगारांसाठी हक्काचे घर,पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी मेगा सीटीत वसतीगृह व शैक्षणिक सुविधा,साखर कामगार हॉस्पिटल,सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा,तरुणासाठी व्यवसाय व रोजगार निर्मिति,नैसर्गिक अतिअल्प क्षेत्र व पाण्यात उत्कृष्ठ शेती,आर्थिक सुविधा दुर्बल कामगार आधार केंद्र आदि मुलभुत सुविधा स्वंयस्फुर्तिने कशा निर्मान  करता येतील याविषयी विषयी सविस्तरांने मार्गदर्शन केले.
राज्यातील साखर कामगार सभासद शेतकरी कौटुंबिक भवितव्यांच्या उज्ज्वल व विधायक  दृष्टीकोनातुन साखर विश्व प्रतिष्ठान संकल्पित आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकारच्या माध्यमातुन आपणच स्वतः हा स्वंयम विकास घडवून शकतो असा परिपूर्ण अशावाद निर्माण केला आहे.

*प्रसंगी कारखान्याचे प्रेसिडेंट श्री. सि. एन. देशपांडे यांनी साखर विश्व प्रतिष्ठानने उभे केलेले काम साखर कामगार व शेतकरी बांधवांसाठी खुप महत्वाचे असून सर्व साखर कामगारांनी 1रुपयाचे महत्व जाणुन,बचत करुन संस्थेचे सभासद होवुन संस्था मोठी कशी होईल है पाहाने अत्यंत गरजेचे आहे, आपले अस्तित्व आपणासच तयार करावयाचे आहे. त्याकरीता सदर सामाजिक संस्थेने लावले रोपटे लगेच अपेक्षा न धरता प्रथम मोठे करा – झाडं मोठे झाले की फळ मिळणारच आहे.यांचे दीर्घकालीन परिणाम आपल्या कौटुबिक जीवनात फार महत्वाचे आहेत ,त्याची आत्ताच् सुरुवात करने अत्यंत गरजेचे आहे अशी भावना व्यक्त केली



जनरल मॅनेजर एन.एम. बंडगर यांनी साखर कामगार,अधिकारी व प्रशसानाचे वतीने सर्वोतोपरी सहकार्य करनार असल्याचे सांगीतले .प्रसगी चिफ केमिस्ट गुनवंत हराळे,चिफ इंजिनीअर रमेश इजाते,चिफ अंकोटट, चिफ अँग्री ऑफिसर,को व डिस्टिलरी -जन मॅनेजर् सिव्हील इंजिनीअर,इंस्टू.मॅनेजर् अरुण खटके,सिनिअर केमिस्ट चव्हानके,साखर विश्व प्रतिष्ठानचे समन्वयक किरण बुनगे,सुनीलकुमार देशमुख आदिसह सर्व विभागाचे अधिकारी पदाधिकारी, साखर कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *