पंढरपूर LIVE 11 ऑक्टोबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या “परदेशात शिक्षणाच्या संधी आणि शिष्यवृत्ती ” हा कार्यक्रम विद्यार्थांना खूप महत्वपूर्ण ठरला. या कार्यक्रमामुळे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
“परदेशात शिक्षणाच्या संधी आणि शिष्यवृत्ती ” या विषयावर पुणे येथील चिन्मय एज्युकेशन कन्सलटन्सी चे संचालक शेखर बिडवई यांनी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेखर बिडवई म्हणाले, परदेशात शिक्षण घ्यायचं झाल्यास सर्वसामान्य घरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामध्ये सर्व प्रथम म्हणजे परदेशातील शिक्षण खर्चाचा. पण आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांपुढील मोठी अडचण दूर झाली आहे.
यावेळी पुढे बोलताना शेखर बिडवई म्हणाले, इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, आर्यलॅड, फॉन्स या देशामध्ये प्रगत देशातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधील उत्कृष्ट शैक्षणिक सोयीसुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालये यांचे मोठय़ा प्रमाणावर आकर्षण भारतीय विद्यार्थ्यांना असते.
शैक्षणिक संस्था या सुरक्षित वातावरणात कार्यरत असल्याने अनेक परदेशी विद्यार्थी आकर्षति होत असतात. इंग्लंडमधील व्हिसाच्या नियमांच्या तुलनेत अमेरिकेतील व्हिसाचे नियम लवचीक आहेत. या देशात इतर युरोपियन देशांपेक्षा रोजगाराच्या संधीही अधिक आहेत. इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, आर्यलॅड, फॉन्स या देशामध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी कोणती विद्यापीठे चांगली आहेत. या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कोण-कोणत्या परीक्षा आहेत. त्याची तयारी कशी करायची व शिष्यवृत्ती च्या कोणत्या सोई उपलब्ध आहेत. या विषयी शेखर बिडवई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्रा. दिपक कोष्टी, सुर्यकांत पाटील, प्रा. प्रविण कलूबर्मे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतले.
फोटो ओळी:- सिंहगडमध्ये “परदेशात शिक्षणाच्या संधी आणि शिष्यवृत्ती ” याविषयी मार्गदर्शन करताना पुणे येथील चिन्मय एज्युकेशन कन्सलटन्सी चे संचालक शेखर बिडवई समोर उपस्थित विद्यार्थी.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







