👁 9 Views

वाचनानेच माणूस प्रगल्भ होतो – डॉ. नारायण पाटोळे

पंढरपूर LIVE 16 ऑक्टोबर 2018

पंढरपूर: दि. “चांगले व्यक्तीचे चरित्र जीवन, कार्य आणि विचार
माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवित असते. विद्यार्थ्यानी वाचनातून व्यक्तिमत्त्व
विकास घडवावा. चांगल्या वाचनानेच माणूस प्रगल्भ होतो. सध्या
विद्यार्थी ग्रथांलयाकडे कमी प्रमाणात जात आहेत तर सोशलमिडियाच्या
आहारी जास्त जात आहेत. महाविद्यालयीन जीवनातून बाहेर पडताना
आपण एखादा चांगला विचार घेतला आहे का? हा प्रश्न स्वतःला
विचारला पाहिजे. असे होत नसेल तर आपण स्वतःचे अध:पतन करीत
आहोत. ” असे प्रतिपादन पंढरपूर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.
नारायण पाटोळे यांनी केले.
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयातील विवेकवाहिनी समितीच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’
साजरा करण्यात आला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अशोक भोईटे होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य भोईटे म्हणाले “महापुरुषांचे
चरित्र वाचन मनुष्याला ध्येयाकडे घेऊन जाते. अब्दुल कलामांच्या
स्वप्नातील भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगल्या ग्रंथांचे वाचन
करावे.” यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, सांस्कृतिक
विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, मराठी विभाग प्रमुख डॉ. देवानंद
सोनटक्के, विवेक वाहिनी समितीचे अध्यक्ष प्रा. उमेश साळुंखे आदी
मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. उमेश साळुंखे यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय प्रा. समाधान बनसाडे यांनी करून दिला.
सूत्रसंचालन कु. अलका घोडके यांनी केले. आभार प्रा. व्ही. एम. गोफणे
यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेत्तर सेवक
विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *