👁 9 Views

पंढरपूर शहर नाभिक सलून दुकान मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

पंढरपूर LIVE 3 नोव्हेंबर 2018

पंढरपूर (प्रतिनिधी)- पंढरपूर शहर नाभिक सलून दुकान संघटनेची मिटींग श्री संत सेना महाराज मठ पंढरपूर येथे दि.1 नोव्हेंबर रोजी  संपन्न झाली. यामध्ये संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी पश्चिम महाराष्ट्र युवक संघटनेचे अध्यक्ष सतीश चव्हाण, शहराध्यक्ष बाळासाहेब देवकर, युवक शहराध्यक्ष महेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या. 
यामध्ये संघटनेच्या चेअरमनपदी पांडुरंग यादव, व्हा.चेअरमनपदी तुकाराम चव्हाण, सचिवपदी परमेश्वर डांगे, सहसचिवपदी हेमंत राऊत, खजिनदारपदी विजय माने, कार्याध्यक्षपदी सुनिल खंडागळे तसेच सल्लगारपदी प्रमोद लाटगावकर, विजय भोसले, प्रकाश चव्हाण, अंकुश भोसले व मार्गदर्शकपदी अनिल सप्ताळ, किशोर भोसले, विष्णू काशीद, माणिक वाघमारे यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

सदरच्या मिटींगमध्ये सलून दुकानातील विविध प्रकाराची दरवाढ करण्यात आली. या मिटींगला सोमनाथ खंडागळे, नागनाथ माने, अशोक माने, प्रशांत शेटे, हणमंत घोडके, नारायण खंडागळे, राजेंद्र भोसले, शंकर राऊत, गणेश सुरवसे, महेश माने, बबलू वाघमारे, दिपक जाधव, सचिन शिंदे, दिनेश सुरवसे यांच्यासह आदि समाजबांधव उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *