👁 10 Views

कार्तिकी यात्रेत भाविकांना चांगल्या सुविधा पुरवा – अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे

पंढरपूर LIVE 15 नोव्हेंबर 2018

          

पंढरपूर, दि.15- कार्तिकी यात्रेत श्री.विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये येतात. येणा-या भाविकांची 65 एकर येथे  राहण्याची सुविधा करण्यात आली असून या सुविधेची, तेथील सुरु असलेल्या कामांचीतसेच वाळवंट, पत्राशेड परिसराची अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पाहणी केली. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याची दक्षता संबंधीत विभागांनी घ्यावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
 यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नायब तहसिलदार किशोर बडवे यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.                                                        
अप्पर जिल्हाधिकारी  रामचंद्र शिंदे यांनी 65 एकर परिसरात भाविकांना व वारकऱ्यांना देण्यात येणार सुविधेबाबतची माहिती घेतली. तसेच येणा-या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी व  शौचालयासाठी पुरेसा पाणी पुरवठा  करावा तसेच अखंडीत वीज पुरवठा करण्याबाबतच्या सुचना संबधितांना दिल्या. वाळवंट, नदीपात्र आणि पत्राशेड परिसरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घ्यावी . तसेच  वाळवंट, 65 एकर, पत्राशेड या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मदत कक्षातील अधिकारी-कर्मचारी यांनी नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *