पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018
सोलापूर, दि. १६- दुष्काळी परिस्थितीत मागेल त्याला मजुरी मिळेल अशा अनुषंगाने उपाय योजना करण्यात याव्यात, अशा सूचना महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे दिल्या.
महसूल मंत्री पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात दुष्काळाबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधिक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सादरीकरण केले. आत्तापर्यंत केलेल्या उपाययोजना यांची माहिती दिली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थितीबाबत माहिती दिली.
महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती बिकट आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने यापुर्वीच उपाययोजना केल्या आहेत. शासननिर्णय जारी केले आहेत. या निर्णयांची प्रभावीरित्या अमंलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. यासाठी महसुल कृषी, सहकार, ग्रामीण पाणी पुरवठा आणि जिल्हा परिषदेने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे.’
दुष्काळावरील उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे. यामधून केंद्र सरकारच्या निकषांनुसार दुष्काळी ठरवलेल्या तालुक्यांना मदत दिली जाईल. पण नियम शिथील करून आणखी मंडलात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या भागात राज्य शासन आपल्या निधीतून मदत करेल. जनावरांच्या चारा लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. थकीत वीज बिले भरुन बंद पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, प्रमोद गायकवाड, श्रीमंत पाटोळे, दीपक शिंदे याचबरोबर महसूल, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







