👁 8 Views

दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता दरवर्षी घेण्यात येणारे कार्यक्रम रद्द करून साध्या पद्धतीने पुण्यतिथी साजरी

पंढरपूर LIVE 17 नोव्हेंबर 2018

स्व. बाळासाहेब बंडगर यांच्या नितीन निमित्त होणारे दरवर्षीची कार्यक्रम रद्द करून दुष्काळ पडल्यामुळे 45 गावच्या कोरडवाहू आंदोलनाला यानिमित्ताने पाठिंबा दिला आहे अशी माहिती मंडळाचे सचिव तानाजी चौगुले यांनी दिली
नंदेश्वर ता मंगळवेढा येथील स्व.बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जर वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यामध्ये कविसंमेलन रक्तदान शिबिर क्रिकेट स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात परंतु या सर्व गोष्टीला या मंडळाने या वर्षी दुष्काळामुळे फाटा दिला आहे

या दक्षिण भागातील 45 गावांमधे दुष्काळसदृश्य परस्थिती निर्माण होते दुष्काळाला सामोरे जावे लागते यावर्षी तर भरीस भर म्हणून एकाच महिन्यात मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील चार जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत यामध्ये निंबोनी येथील दोघांनी आत्महत्या केली आहे तर पडोळकरवाडी येथील एकाने आत्महत्या केली तर पाटखळ येथील भारत गडदे नुकतीच कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे यांना श्रद्धांजली म्हणून स्व. बाळासाहेब बंडगर मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने राबविण्यात येणारे कार्यक्रम रद्द करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली दरवर्षी रक्तदान शिबिर कवी संमेलन, धनगरी ओव्या स्पर्धा, गजी ढोल स्पर्धा, घेण्यात येत होत्या परंतु दुष्काळामुळे या स्पर्धेला फाटा देत यावेळी साध्या पद्धतीने पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला बाळकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विष्णू दादा बंडगर शंकर बंडगर, विलास मासाळ, बाळू मासाळ, समाधान मोठे ,रविकांत लोहार, जगन्नाथ मेटकरी ,पप्पु बंडगर, श्रीकांत बंडगर, रावसाहेब बंडगर ,बाळासाहेब मासाळ, यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला यावेळी बाळकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विष्णू दादा बंडगर बोलताना म्हणाले सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मंडळाने उपक्रम राबवले नाहीत हि कौतुकास्पद बाब आहे दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात यावर्षी मात्र दुष्काळी जनतेचे नेते अंकुशराव पडवळे ,सभापती प्रदीप खांडेकर, बापूसाहेब मेटकरी यांनी मंडळाच्या या गोष्टीचे कौतुक केले

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आंदोलन चालू केले आहे त्यामुळे दरवर्षी होणारे कार्यक्रम रद्द करून त्यांच्या आंदोलनाला स्व.बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे कार्यक्रम रद्द करून त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा साजरा केला गेला यावेळी बाळकृष्ण मठाचे शिवशंकर लाड, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विष्णू बंडगर, शंकर बंडगर ,बापू बंडगर, रावसाहेब बंडगर ,वैभव मासाळ, भीमा मासाळ, मनोहर कांबळे, बाळासाहेब माने, चंद्रकांत कुंभार ,उमेश शिरसागर ,यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *