पंढरपूर LIVE 17 नोव्हेंबर 2018
सोलापूर दि. 17 :- कार्तिक वारी कालावधीत पंढरपूर व पंढरपूर परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणुन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मनेाज पाटील यांनी पंढरपूर शहरातील महत्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतुक व प्रवेश बंद याबाबतचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये जारी केले आहेत.
या आदेशानुसार अ) पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या वाहनांबाबत – 1) नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळ कडून येणारी वाहने करकंब कॉस रोड, तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील, 2) पुणे , सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी किंवा कॉलेज क्रॉस चौकीच्या पाठीमागील जागा किंवा के.बी.पी. कॉलेजच्या पाठीमागील लिंक रोड लगतच्या मैदानात पार्किंग करतील. 3) कराड, सांगली, मिरज सांगोला मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्किंग करीता जातील, 4) कोल्हापुर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने ही यमाई, तुकाई पार्किंग किंवा बिडारी बंगला पार्किंग येथे पार्क करतील किंवा सदर वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कुल मैदान किंवा वेबर हाऊस येथे पार्किंग करीता जातील. 5) विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने ही अनवली फाटा, कासेगाव गाव, कासेगांव फाटा मार्गे येवून यमाई तुकाई पार्किंग किंवा बिडारी बंगला पार्किंग येथे पार्क करतील किंवा सदर वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कुल मैदान किंवा वेअर हाऊस येथे पार्किंग करीता जातील.
ब) शहरातून बाहेर जाणा-या वाहतुकीबाबत – 1) टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉसरोड, करकंब चौक मार्गे जातील. 2) पुणे, साताराकडे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक ते नवीन कराड चाक, कॉलेज क्रॉस रोड, वाखरी मार्गे इच्छित स्थळी जातील. 3) विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक ते नवीन कराड नाका गादेगाव फाटा पासून संबंधित मार्गाने इच्छित स्थळी जातील.
क) पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत – 1) 23 नोव्हेंबर 2018 पर्यंत संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येईल. 2) महाद्वार चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारचे वाहनांसाठी व वाहतुकीसाठी प्रवेश बंद राहील. 3) सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद राहील. 4) बार्शी सोलापूर मार्गावरुन तीन रस्ता येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात उतरतील. 5) नियमित येणारी सर्व वाहने व यात्रेसाठी सोडण्यात येणा-या एस.टी. बसेस यांना जुना दगडीपूल ते तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येत आहे. 6) मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक मार्गाने शहरात सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद राहील. 7) अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक सावरकर चौक ते अर्बन बँक भक्तीमार्ग ते काळामारुती चौक मार्गावर सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद राहील. 8) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण अभियानांतर्गत भिमा नदी पुल ते मटण मार्केट ते अर्बन बँक रस्त्याचा समावेश असल्याने सदर मार्गावर सर्व वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
ड) पार्कींग व्यवस्था – 1) नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किंग करतील, 2) पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस मैदान किंवा कॉलेज क्रॉस चौकीच्या पाठीमागील जागा किंवा के.बी.पी. कॉलेजच्या पाठीमागील रोड लगतच्या मैदानात पार्किंग करतील. 3) कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्किंग करता येतील. 4) कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने यमाई तुकाई पार्किंग किंवा बिडारी बंगला पार्किंग येथे पार्क करतील किंवा कासेगांव फाटरा, टाकळी मार्गे येवून हायस्कुल मैदान किंवा वेअर हाऊस येथे पार्किंग करता येतील. 5) विजापूर, मंगळवेढा कडून येणारी वाहने अनवली फाटा, कासेगांव गाव, कासेगांव फाटा मार्गे येवून यमाई तुकाई पार्किंग किंवा बिडारी बंगला पार्किंग येथे पार्क करतील किंवा सदर वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कुल मैदान किंवा वेअर हाऊस येथे पार्किंग करीता जातील. 6) यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण येथे तसेच संबंधित मठामध्ये पार्क होतील व इतर वाहने जुन्या कराड नाक्यासमोरील रेल्वे मैदान व मार्केट यार्ड येथे पार्क होतील. 7) शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पर्किंग होणार नाहीत.
इ) एकेरी मार्ग – कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सहकार चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका यामार्गावर एकेरी वाहतुक राहील.
ई) शहराबाहेरुन जाणा-या वाहतुकीबाबत – सोलापूर बार्शी, नगर बाजूकडून नियमितपणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन वेळापूर, अकलुज, महुद, सांगोला, मंगळवेढा बाजुकडे जाणारी जड व अवजड ( सार्वजनिक वितरण व्यवस्था, शासकीय अन्नधान्य वाहतुकीची वाहने, केरोसीन, डिझेल, पेट्रोल व गॅस सिलेंडरची वाहतुक करणारी वाहने, ट्रँक्टर ट्रॉलीसह व ऊस वाहतुक करणारी वाहने वगळून) वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, वेणेगांव फाटा, अहिल्या चौक पंढरपूर येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग – मोहोळ, कामती, मंगळवेढा, सांगोला मार्गे इच्छित स्थळी किंवा मोहोळ, शेटफळ, टेंभूर्णी, वेळापूर, साळमुख फाटा, महूद,, सांगोला मार्गे इच्छित स्थळी 2) विजापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, आटपाडी, पुणे बाजुकडुन नियमितपणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन टेंभुर्णी, शेटफळ, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, बाजुकडे जाणारी जड- अवजड, वाहनांना ( सार्वजनिक वितरण व्यवस्था, शासकीय अन्नधान्य वाहतुकीची वाहने) केरोसीन, डिझेल, पेट्रोल व गॅस सिलेंडर ची वाहतुक करणारी वाहने, ट्रॅक्टर ट्रॉलीसह व ऊस वाहतुक करणारी वाहने वगळून ) कुरुल फाटा, मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महुद फाटा, साळमुख फाटा, श्री ज्ञानेश्वर चौक वेळापूर येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग – कामती, मंगळवेढा, सांगोला, महुद, वेळापूर, अकलुज, टेंभूर्णी मार्गे इच्छित स्थळी किंवा वेळापूर, महुद, सांगोला, मंगळवेढा, कामती, मोहोळ मार्गे इच्छित स्थळी जातील.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







