👁 8 Views

लोटस इंग्लिश स्कूलच्या दोघांना दिन दयाळ स्पर्श योजना या केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड

पंढरपूर LIVE 24 नोव्हेंबर 2018

 राज्यातील सतरा हजारांमधून लोटसच्या दोघांची निवड
पंढरपूर– सप्टेंबर महिन्यात भारतीय पोस्ट खात्यामार्फत घेण्यात आलेल्या ‘दिन दयाळ स्पर्श योजना’या  केंद्रीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भारतातील महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यातून सतरा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कासेगाव (ता. पंढरपूर) श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलितलोटस इंग्लिश स्कूल मधील तब्बल ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून आदित्य अभिजित बेणारे(इ. आठवी) आणि सार्थक सुनील रणदिवे (इ सहावी) या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून त्यांना एका वर्षासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये मंजूर झाले आहे. अशी  माहिती प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी दिली.

            

पंढरपूर पंचक्रोशीत विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पूर्वी उच्च तंत्रशिक्षण मिळत नव्हते तंत्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर गावी जावे लागत होते. यामुळे साहजिकच पालकांचाही वेळ व पैसा अधिक प्रमाणात वायफळ खर्ची पडत होते आणि हीच तळमळ ओळखून डॉ. बी.पी.रोंगे यांनी सुरवातीला गोपाळपूरमध्ये स्वेरीची स्थापना केली. प्रचंड मेहनत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी घेत असलेले परिश्रम पाहून अफाट यश मिळाले. नेमका हाच धागा पकडून पंढरपूर पंचक्रोशीतील जनतेची अपेक्षा आणखीन वाढली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सोय झाली. त्याप्रमाणेच ‘लहान मुलांसाठी देखील इंग्रजी माध्यमाची शाळा असावी’ अशी अपेक्षा व्यक्त केली. याचीच पूर्तता करताना स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी आठ वर्षापूर्वी म्हणजे २०१० साली श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,लोटस इंग्लिश स्कूलची स्थापना केली.तेथून प्रचंड मेहनत, योग्य नियोजनांच्या बळावर इथे देखील शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी घौडदौड सुरु झाली. शिक्षण क्षेत्रात प्रत्येक वेळी नवनवीन प्रयोग राबवीत असताना विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या माध्यमातून बौद्धिक विकास होवून प्रगती कशी उंचावेल? याकडे मात्र पुरेपूर लक्ष दिले आहे आणि अजूनही देत आहेत. ‘विजय मिळवण्यापेक्षा प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेणे महत्वाचे असते’ या विचारांना धरून प्रत्येक स्पर्धेत लोटसची चिमुकली मुले तयारीनिशी उतरवितात. त्यांचे कठोर परिश्रम पाहून यशाची माळ गळ्यात पडते. हे इथे सिद्ध होत आहे.  संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या डॉ. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहशिक्षकांच्या सहकार्याने घेत असलेल्या परिश्रमामुळे घवघवीत यश मिळत आहे. आदित्य बेणारे आणि सार्थक रणदिवे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यामुळे संस्थेचे सचिव डॉ बी.पी. रोंगे,अध्यक्ष बी.डी. रोंगे,उपाध्यक्ष एच.एम.बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी, पालक वर्ग, प्राचार्या डॉ जयश्री चव्हाण, सहशिक्षक संतोष गाढवेसंपत लवटे ,दादासाहेब पटेलसोनम इंगळे, पल्लवी साळुंखे इतर शिक्षकांनी  अभिनंदन होत आहे

    



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *