👁 7 Views

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरदोत्सव 2018 चे आयोजन

पंढरपूर LIVE 24 नोव्हेंबर 2018


पंढरपूर । प्रतिनिधी,
देशाचे नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीने शरदोत्सव 2018  निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती श्रीकांत शिंदे, सुरज पेंडाल, श्रीराम माने, राजन जगताप यांनी दिली.
लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपले जीवन महाराष्ट्रातील व देशातील शेतकऱ्यांसाठी सत्तेत असताना अनेक हिताचे निर्णय घेतले. त्यांनी आजपर्यंत दिलेल्या योगदानाचे कधीही मोजमाप करता येणार नाही. त्यांच्या 78 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, कलाकारांच्या कलेला व विचारांना एक व्यासपीठ शरदोत्सव 2018 च्या निमित्ताने निर्माण केलेले आहे. यामध्ये दि.1 डिसेंबर 2018 रोजी निबंध स्पर्धा प्रत्येक शाळांमध्ये आयोजित करण्यात आली असून यामध्ये 5 वी ते 7 वी साठी शरदचंद्रजी पवार साहेब, माझी शाळा, माझा आवडता नेता, माझी आई, झाडे लावा झाडे जगवा व 8 वी ते 10 वी साठी शरदचंद्रजी पवार साहेब, ग्राम स्वच्छतेचे दुत संत गाडगे बाबा, आई मला उमलू दे, माझा आवडता महापुरूष, पंढरपूरची स्वच्छता काळाची गरज असे निबंध स्पर्धेसाठी विषय दोन गटांसाठी वेगवेगळे विषय ठेवण्यात आलेले आहेत. 
    

दि.3 डिसेंबर रोजी रंगभरण ही स्पर्धा प्रत्येक शाळेत, दि.4 डिसेंबर रोजी भजन स्पर्धा बाळकृष्ण फणसे महाराज मठ विसावा मंदिर समोर पंढरपूर यासाठी सचिदानंद कुलकर्णी महाराज मो.9850110106 यांच्याशी संपर्क साधावा. दि.5 डिसेंबर भव्य खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन श्री संत तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे करण्यात आले असून यामध्ये वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व गुणांचा त्रिवेणी संगम शरदचंद्रजी पवार साहेब, शेतकरी कर्जमाफी आणि महापापी, भारत देशाच्या जडणघडणीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांची भूमिका, महिला सबलीकरण काळाची गरज, अरं.. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विषय ठेवण्यात आलेले आहेत. यासाठी दादासाहेब तळेकर मो.9923709172 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच दि.6 डिसेंबर रोजी समुह नृत्य स्पर्धा व डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी सुरज कांबळे मो.9975171775 यांच्याशी संपर्क साधावा. डान्स स्पर्धेसाठी अनुक्रमे 10 हजार, 7 हजार, 5 हजार, व भजन स्पर्धेसाठी 3 हजार, 2 हजार, 1 हजार, वक्तृत्व स्पर्धेसाठी 5 हजार, 3 हजार, 2 हजार, निबंध स्पर्धा व रंगभरण स्पर्धेसाठी दीड हजार, 1 हजार, सातशे रूपये, स्मृतीचिन्ह  व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सदरचे कार्यक्रम जिल्हाध्यक्ष मा.आमदार दिपकआबा साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, राजूबापू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, हणमंत पवार, युवक जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, पंढरपूर तालुकाध्यक्ष दिपक पवार, पंढरपूर- मंगळवेढा अध्यक्ष दिपक वाडदेकर, जिल्हा सरचिटणीस सलीम मुलाणी, आर.डी.पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, शहर कार्याध्यक्ष दिगंबर सुडके, युवक शहराध्यक्ष संदिप मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली शरदोत्सव 2018 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *