पंढरपूर LIVE 28 नोव्हेंबर 2018
पंढरपूर, दि.28 – दुष्काळामुळे चारा पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी तालुक्यातील पाणी नसलेल्या जलाशय आणि तलावाखाली जमिनीवर चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन तहसीलदार मधुसून बर्गे यांनी केले.
दुष्काळ परस्थितीवर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत तहसिल कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी अमोल घोडके, नायब तहसिलदार विलास महाजन, नायब तहसीलदार श्री.राणे, पशुधन विकास अधिकारी एस.एस. भिंगारे, कृषि विभागाचे मारुती कौलगे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी तसेच मंडलाधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखालील, तलावाखालील जमीन शेतकऱ्यांना चारा पिके उत्पादनाकरिता ,सन 2018-19 मधील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी नामपात्र 1 रूपये दराने भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहे. तरी पात्र इच्छुकांनी 4 डिसेंबरपर्यंत अर्ज जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना तसेच पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहनही तहसीलदार बर्गे यांनी केले.
तालुक्यात 36 पाझर तलाव तसेच तिसंगी व सोनके मोठे तलाव असून, संबधित ठिकाणी गाळपेरसाठी कृषि व पशुसंवर्धन विभागाने जनजागृती करावी. शेतीच्या निगडीत शेतकऱ्यांचे कर्ज वसूली जबरदस्तीने करु नये. पाणंद रस्स्त्यासाठी संबधित विभागाने तात्काळ प्रस्ताव पाठवावेत. वनीकरण, बांधावर वृक्ष लागवड, गावरस्ते आदी कामे तात्काळ सुरु करावीत. तसेच मोटार पंपाव्दारे अवैध पाणी उपसा करण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







