👁 10 Views

पंढरपूर सेंट्रल बँक इमारत आगीची घटना… बँकेतील विविध साहित्य व मशिनरीज जळाल्याने 5 लाखांचे नुकसान!

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018

काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास स्टेशनरोड नजीक शामीयाना हॉटेल शेजारील नाईक कॉम्पलेक्समधील सेंट्रल बँक इमारतीच्या तळमजल्यावरील गुरुप्रसाद टेलर्स या दुकानाला आग लागली होती. टेलरिंगच्या हे संपुर्ण दुकान आगीत भस्मसात झाले आहे. या दुकानातील नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समजलेला नाही. अग्निशमक दलाच्या जवानांनी मोठ्या हिकमतीने ही आग विझवली. परंतु या आगीची झळ सेंट्रल बँकेलाही बसली असून बँकेतील विविध वस्तु व कांही मशिनरीज जळाल्याने बँकेचे  5 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याबाबतची माहिती करण भौवरीलाल सिंग (58), रा.महात्मा फुले नगर, कोर्टी रोड, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

कॉम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक वायरिंग, वॉल फॅन, बायोमॅट्रिक मशिन, खुर्ची, टेबल, खिडकीच्या काचा, सिलींग फॅन, ट्युब लाईट, फाईल्स्, की बोर्ड, प्रिंटर, स्कॅनर, कॅश कौंटींग मशिन, आदी विविध वस्तु जळाल्याने एकुण 5 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

इलेक्ट्रॉनिक शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहाणी झाली नाही. पुढील तपास पोहेकॉ खांडेकर हे करत आहेत. अशी माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाणेकडून मिळाली.  

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *