पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- राज्यसरकारने सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करुन अनेक दिवस झाले तरी अद्याप जिल्ह्यातील दुष्काळ निवारण संदर्भातील कोणत्याही योजनांची अंमलबजाववणी महसुल प्रशासनाने घेतलेली नाही. दुष्काळाच्या तीव्र झळांमुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे. तरी लवकरात लवकर यासंदर्भातील उपाययोजनांसाठी महसुल प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत. दि. 6 डिसेंबर 2018 रोजी या व इतर कांही मागण्यासंदर्भाचे निवेदन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन, पंढरपूर तालुका यांच्यावतीने पंढरपूर चे तहसिलदार यांना देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. आवश्यक त्या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु करावा, जिल्ह्यातील हुमनी बाधीत ऊसांचे पंचनामे करुन लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करावी, पिकविम्याचीॅ रक्कम त्वरीत शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकर्यांची वीजबिले माफ करावीत, शेतकर्यांचा सात-बारा कोरा करावा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानातून आवश्यक असणारा धान्य पुरवठा करण्यात यावा, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण झाली आहे तरी चारा उपलब्ध करुन पशुधन जगण्यासाठी चारा छावण्या उभा कराव्यात. अशा प्रकारच्या मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
वरील सर्व मागण्यांची पुर्तता त्वरीत करावी अन्यथा अ.भा.छावा युवा संघटन च्या वतीने आंदोलन करण्यात येईल. व यामुळे होणार्या सर्व परिणामास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा देण्यात आला आहे. अ.भा. छावा मराठा युवा संघटनचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड, तालुकाध्यक्ष सागर रणदिवे यांच्या हस्ते हे निवेदन नायब तहसिलदार श्री.तिटकारे यांना देण्यात आाले. यावेळी आय.टी. विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर कदम, समाजसेवक संतोष कवडे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर जगताप, शहराध्यक्ष सतिश माने, युवक शहराध्यक्ष निलेश कोरके, रविराज रोकडे, सिध्देश्वर रणदिवे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com