👁 7 Views

केंद्रीय पथकाने साधला शेतकऱ्यांशी संवाद.. दुष्काळी गावांना भेट

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018

.करमाळा तालुक्यातील दुष्काळी गावांना भेट
सोलापूर, दि. ५ – दुष्काळाची पहाणी करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकाने आज जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जातेगाव, बिटरगाव (एस), गावातील पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पथकातील एफसीआयचे उपसंचालक एम.जी.टेंभुणे आणि चारा विशेषतज्ज्ञ विजय ठाकरे यांनी ग्रामस्थाशी संवाद साधला. पथकाने  पाहणी केली.
            यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  राजेंद्र भारुड,  पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांतधिकारी मारुती बोरकर, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.
जातेगाव येथे किसन वारे यांच्या कापूस पिकाची, दत्तात्रय राजेंद्र मोरे यांच्या तूर पिकाची, बिटरगाव येथे लटके यांच्या तूर पिकाची, दळवी यांच्या लिंबूची पाहणी केली. रोशेवाडी येथे धोंडीराम खोत यांच्या विहिरीची  पहाणी केली.
कामोणे, बिटरगाव आणि रोशेवाडी येथे शेतकरी ग्रामस्थाशी संवाद साधून विचारपूस केली. शेतकऱ्यांनी घेतलेले पीक, आलेले उत्पादन, झालेला खर्चाची माहिती घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला असल्याचे सांगितले. दुष्काळामुळे पाणी, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असेही सांगितले.

आंधळगाव व राजापूर गावातील
दुष्काळ परिस्थिची केंद्रीय पथकाकडून पाहणी

सोलापूर दि. 6 :- दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव आणि सांगोला तालुक्यातील राजापूर गावांना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली.
दुष्काळ पाहणी पथकामधील एफसीआयचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, एफसीआयचे उपसंचालक एम.जी.टेंभुणे आणि चारा विशेषतज्ञ विजय ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड,  कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांतधिकारी प्रमोद गायकवाड, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने आदी उपस्थित होते.
आंधळगाव येथील शेतकरी सीताराम वेळापुरे यांच्या शेतीची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.  खरीप हंगामात झालेली पेरणी, आलेले उत्पादन, झालेला खर्च, जनावरांसाठी चारा याची माहिती घेतली.
सांगोला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी मधुकर तोडकरे यांच्या शेतीची पाहणी करून यशवंत पुजारी यांच्या विहिरीची पाहणी केली. विहिरीत टँकरने पाणी सोडत असल्याचे पुजारी यांनी सांगितले. राजापूर येथे उपस्थित शेतकऱ्यांकडून दुष्काळाबाबत माहिती जाणून घेतली.
राजापूर येथे आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत केंद्रीय पथकास माहिती दिली.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *