👁 10 Views

पंढरीतील सार्वजनिक मुता-यात घाणीचे साम्राज्य… वारकरी भाविकांसह पंढरपुरकरांचे आरोग्य धोक्यात… पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष!

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018

पंढरपूर शहरातील सार्वजनिक मुता-यांची स्वच्छता वेळच्यावेळी केली जात नाही. अशा अनेक मुता-या पंढरपूर शहर व उपनगरात आहेत की ज्या मुता-यांमध्ये महिनाभर साधे पाणी सुध्दा ओतले जात नाही. पंढरपूर नगरपरिषदेच्या “स्वच्छ व सुंदर पंढरपूर” या ब्रीदवाक्याचा खरंच तिटकारा वाटावा इतपत इथं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आढळून येतय. त्यामुळे सर्वसामान्य पंढरपुरकरांसह वारकरी भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पंढरपूर नगरपरिषदेत आपणच निवडुन दिलेले अनेक नगरसेवक आपल्या प्रभागात निवडणुकीनंतर साधे फिरकतही नाहीत. हा कटु अनुभव पंढरपुरकरांना आहेच! आपल्या प्रभागातील रस्ते, रोडलाईट, स्वच्छता व इतर प्रश्न भलेही  प्रलंबीत राहिले तरी ते आमचे संयमी पंढरपुरकर समजून घेत असतील; परंतु किमान सार्वजनिक स्वच्छता तरी सुरळीतपणे करावी. ही अपेक्षा करणं काही वावगं नाही.
आपण निवडून दिलेले मेंबर स्वतःच्या पदाचा वापर केवळ निवडणुकीत खर्च झालेली रक्कम दामदुप्पट सव्याजासह कधी, कुठून, कशी वसुल करता येईल यातच गुंतलेले असतात. त्यामुळे त्यांना नागरिकांच्या व्यथा व समस्या जाणुन घेण्यासाठी वेळ नसतो. अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधुन व्यक्त होत आहे. यात खरे, खोटे काय हे माहित नाही; पण किमान सार्वजनिक स्वच्छतेची काळजी तरी मेंबर मंडळींनी घ्यायला हवी. अशी माफक अपेक्षा काही जागरुक नागरिकांनी पंढरपूर लाईव्हकडे व्यक्त केली आहे.
पंढरपूरकर व इथं येणारे लाखो वारकरी भाविक नक्कीच संयमी आहेत. पण त्यांच्या संयमाचा अंत न बघता पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून संबंधीत विभागाला तातडीने आदेश देऊन पंढरीतील सार्वजनिक स्वच्छतेची वेळच्यावेळी अंमलबजावणी होईल. याकडे लक्ष द्यावे. एवढीच माफक अपेक्षा.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *