पंढरपूर LIVE 7 डिसेंबर 2018
पंढरपूर दि 07. :- समाजातील सर्व घटकांनी एचआयव्ही बाधितांसोबत कोणताही भेदभाव न करता त्यांना माणसुकीची वागणूक दयावी, असे आवाहन न्यायाधिश श्रीमती आर.के.शेख यांनी केलेले.
जागतिक एडस् दिन व सप्ताहाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे एडस् बाबत जागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा रुग्णालच्या अधिक्षका डॉ. जयश्री ढवळे, शहर पोलीस निरिक्षक राजेश गवळी, एस.टी आगार प्रमुख सुनिल जाधव डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. अविनाश बुईके, डॉ.अनिता धसे, डॉ.वाळुजकर, डॉ.प्रसन्न भातलवंडे, डॉ.आशा घोडके, डॉ. दिपक धोत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी न्यायाधिश श्रीमती शेख म्हणाल्या, समाजात एचआयव्ही बाधितांना आपुलकीची वागणूक द्यावी. एडस् बाधितांनी आपले जीवन आनंदी जगावे. आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देवून, समाजात वेगळा ठसा निर्माण करावा. त्यातुनच समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करावे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे म्हणाल्या व्यापक जनजागृती माध्यमातून एचआयव्ही संसर्ग प्रमाण कमी झाले असून, पंढरपूर परिसरात सर्वसाधारण व्यक्तीमध्ये एच.आय.व्ही संसर्ग आजाराचे प्रमाण 1.4 टक्के तर गर्भवती माता यांचे संसर्ग प्रमाण 0.01 टक्का इतका असल्याचे सांगितले. तसेच 10 एचआयव्ही संसर्गित महिलांच्या कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जागतिक एडस् नियंत्रण सप्ताहाचे ‘ नाऊ युव्हर स्टेटस ‘ हे घोष वाक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कार्यक्रमात एच.आय.व्ही संसर्गित गर्भवती माता, रक्तक्षय तसेच क्षयरुग्ण व संसर्गित बालके यांना षोषण आहार खाऊ व रक्तवर्धित औषध वाटप करण्यात आले. गरीब व गरजू एच.आय.व्ही संसर्गितांना एआरटी केंद्रावर औषध घेण्याकरीता महिन्यातून दोन वेळेस एस.टी. महामंडळाकडून 80 कि.मी. पर्यतचा मोफत प्रवास पास उपलब्ध करुन दिला आहे. याचा लाभ एच.आय.व्ही संसर्गितांनी घ्यावा असे आवाहन एस.टी.महामंडळाकडून करण्यात आले.
यावेळी पुरुषोत्तम कदम, बाजीराव नामदे, बिहान स्वयंसेवी संस्थेचे समन्वयक गितांजली वायदंडे, सुधीर भातलवंडे, एजाज बागवान, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com