👁 8 Views

अपंगासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध -समाधान आवताडे

पंढरपूर LIVE ११ डिसेंबर २०१८


अपंगाच्या अंगी एक सुप्त शक्ती असते. त्याचा त्यांनी शोध घेतल्यास ते चांगले काम करू शकतात असे उदगार श्री. संत दामाजी कारखान्याचे चेअरमन श्री. समाधान आवताडे यांनी काढले. पंढरपूर येथे कृत्रिम हात पाय (जयपूर फूट) वाटप शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते  म्हणाले अपंगाची सेवा ही सर्वोत्कृष्ट सेवा असते. अपंगांना सरकारी योजना व अपंगाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाते. अपंगांना मोठ्या प्रमाणात निधी येत असतो . त्याचा पाठपुरावा करून त्या योजनेची माहिती व लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. कुटुंबात अपंग व्यक्ती असल्यास पूर्ण कुटुंबियाला मानसिक त्रासातून जावे लागते. अशा वेळी समाजाने आपला दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास १५०० तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे. यापुढेही पंढरपूर-मंगळवेढा भागात चांगले उद्योग निर्माण करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. यापूर्वी वाखरी येथे मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत ऑपरेशन शिबिराचे आयोजन केले होते. याचाही लाभ सर्वसामान्यांना झाला आहे. पंढरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलचाही प्रश्न आहे सदरचे हॉस्पिटलमध्ये कॉट मर्यादा वाढवणे गरजेचे आहे. यासाठी मी निश्चित पाठपुरावा करेन असे शेवटी ते म्हणाले.

            सदर प्रसंगी फॅबटेक उद्योग समूहाचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर म्हणाले, श्री. समाधान आवताडे यशस्वी उद्योजक आहेत. राजकारणात काम करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. अपंगासाठी अनेक शासकीय योजना असतात. याचा लाभ अपंगांना मिळवून देण्यासाठी चेअरमन श्री. समाधान आवताडे यांनी प्रयत्न करावे असे ते शेवटी म्हणाले. ह. भ. प. जगन्नाथ महाराज देशमुख मनोगतामध्ये म्हणाले की, माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचे आहे. वारकरी, शेतकरी आणि धारकरी एकत्र आल्याशिवाय काहीही साध्य होत नसते. पंढरपूर मंगळवेढा येथे जे पिकते ते महाराष्ट्रात विकते. श्री. समाधान आवताडे यांनी सर्व समाजातील घटकांसाठी चांगले काम सुरू केले आहे.
      

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील म्हणाले, राजकारणात आपण माजी होऊ शकतो परंतु समाजसेवकास माजी म्हणता येत नाही. या शिबिरामध्ये ३२५ च्या पुढे दिव्यांगना मदत झाली आहे ह. भ. प. बद्रीनाथ तनपुरे महाराज म्हणाले, भविष्यकाळातील भवितव्य समाधान आवताडे यांच्या हातून घडणार आहे. त्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सामावून घ्यावे. स्टीफन हॉकिंग या जगविख्यात तत्ववेत्ता अपंगच होता. परंतु कर्तुत्वावर त्यांनी यश मिळवले. श्री. समाधान आवताडे यांच्या रूपाने नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या पाठीशी सर्वांनी रहावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये शेखरभाऊ भोसले, सुभाष भोसले, डॉ. प्रशांत निकम, दिगंबर यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुचना संतोष कवडे यांनी मांडले तर अनुमोदन मुन्ना मलपे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद लटके यांनी केले.
          
          श्री. समाधान आवताडे युवामंच पंढरपूर मंगळवेढा व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जयपूर फूट मोफत वाटप शिबिरामध्ये एकूण ३५९ रुग्णांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी समाज कल्याण सभापती सौ. शिलाताई शिवशरण, डॉ. पारस राका , डॉ. सोनवणे, डॉ. खाडिलकर , डॉ. सुमित साळुंखे, साधू वासवानी मिशन पुणेचे डॉ. मिलिंद जाधव , डॉ. सलील जैन, डॉ. सुशील ढगे, डॉ. जितेंद्र राठोड , डॉ. ज्ञानेश्वर पाटील प्रा. येताळा भगत सर मंगळवेढा मार्केट कमिटी चे सभापती श्री. सोमनाथ आवताडे, श्री. दत्ता जमदाडे सर, दामाजी कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप, राजेंद्र सुरवसे, सुरेश भाकरे शिवयोग्याप्पा पुजारी, राजीव बाबर, मारुती थोरबोले, प्रमोदकुमार म्हमाणे, भारत निकम, दामाजी कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर, वर्क्स मॅनेजर सुहास शिनगारे, नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, चंद्रकांत पडवळे, दीपक माने, संदीप मुटकुळे, सागर चव्हाण, लखन थिटे, अशोक विटकर, रोहित पानकर, पांडुरंग करकमकर, ह. भ. प. गणेश महाराज पाटील, अमोल धोत्रे, स्वागत कदम, सज्जन आवताडे, सुभाष शिंदे, सुनील गायकवाड, सदानंद मस्के, सुधाकर फटे, अतुल लटके, योगेश कांबळे, सुरज कदम, शांतिलाल बागल, दत्ता साबने, पै. अशोक चौंडे, अनिल कांबळे, राजू मेथकुठे, बालाजी जाधव, आमीन मुलाणी, बबनतात्या पाटील, बिभीषण जाधव, तानाजी नागटिळक, गणेश भुसनर, सुधाकर गायकवाड, महेश चव्हाण, तानाजी जाधव, देविदास खुळे आदी उपस्थित होते 
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक उन्हाळे, सुरज कदम यांनी मांडले.
                                             

  अपंगाच्या  वतीने लक्ष्मण भांडे, पंढरपूर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी अपंग आहे मला समाधान दादांनी या शिबिरासाठी बोलावले मला २० वर्ष मला कोणीही मदत केली नाही श्री समाधान आवताडे यांनी मला न्याय दिला अशी भावना व्यक्त केली.

दिलीप साबळे स म्हणजे संयम मा म्हणजे मानवतावाद धा म्हणजे धाडस न म्हणजे नम्रता असा दादा तुमचा स्वभाव  आहे.
 गणेश महाराज पाटील (लातूरकर) दैवत्वाचे अंतकरण म्हणजे समाधानजी आवताडे, झाले बहु होतीलही बहु पण असे कोणी होणार त्याचे नाव चंद्र सूर्य आहे ते म्हणजे समाधान दादा

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *