👁 9 Views

जे नको ते मतदारांनी नाकारले; मतदारांचे अभिनंदन ! – उद्धव ठाकरे

पंढरपूर LIVE ११ डिसेंबर २०१८


मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –  “पर्याय कोण ? या फालतू प्रश्नात गुंतून न पडता चार राज्यातील मतदारांनी जे धाडस दाखवले त्यांच्या बेडरपणाचे मी अभिनंदन करतो, ” अशा प्रखर शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

चार राज्यातील निवडणूक निकालांवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण निकालानंतर आपले मत मांडले. “निवडणुकीत हार – जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन होतच असते. पण चार राज्यात परिवर्तन घडवणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ते ईव्हीएम, पैसेवाटप, गुंडागर्दी आणि त्याही पेक्षा पर्याय कोण ? या फालतू प्रश्नात गुंतून न पडता जे नको त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले. पुढचे पुढे काय ते बघू. हेच खरे धाडस आहे. मतदारांच्या धाडसाने देशाला दाखविलेली ही दिशा आहे.  त्या सर्व मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,” असे शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *