👁 12 Views

जिल्हा परिषदच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मोफत एम.एस.-सी.आय.टी. आणि टॅली प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

पंढरपूर LIVE 12 डिसेंबर 2018 


रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भारताचे माजी कृषीमंत्री मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण विभाग यांच्या वतीने यशवंत माध्य. व उच्च. माध्य. विद्यालय भोसे(क) येथे मोफत एम.एस.-सी.आय.टी. आणि टॅली प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन मा.श्री. राजूबापू पाटील,जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयटी पॉईंटचे संचालक श्री. राजेंद्र भोसले यांनी केले. यावेळी ते ग्रामीण भागातील महिला व मुली मुले यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त होऊन व सरकारी अथवा खासगी नोकरी मिळविण्यासाठी प्रमाणपत्राचा उपयोग होतो असे म्हणाले. या निमित्ताने मा.श्री. राजूबापू पाटील यांच्या शुभहस्ते विधार्थ्याना एम.एस.-सी.आय.टी. आणि टॅलीच्या अभ्यासक्रमाचे पुस्तके देवून सन्मानित केले व प्रशिक्षणासाठी शुभेच्छ्या दिल्या.


या कार्यक्रमाला मा. काळे एम.व्ही. माजी मुख्याध्यापक, जि.प. सदस्य श्री.अतुल खरात, विद्यालयाचे प्राचार्य श्री.मडके बी.के. , उपप्राचार्य श्री. माने यु.वाय. सुपरवाइझर, श्री. मिसकर एस.बी. व सिनिअर लेखनिक श्री. कुंभार एस.एम. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. माळी धनंजय यांनी केले. 

    

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *