👁 9 Views

महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा निवड चाचणी स्पर्धे चा शानदार समारोप.

पंढरपूर LIVE 13 डिसेंबर 2018 

सोलापूर जिल्हा कुस्ती संघ समाधान (दादा) आवताडे युवामंच पंढरपूर – मंगळवेढा यांच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट कमिटी) मंगळवेढा येथील मैदानात दिनांक ११ व १२ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सदर स्पर्धेचा समारोप झाला. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हा. चेअरमन व दामाजी सहकारी कारखान्याचे  ज्येष्ठ संचालक श्री बबनराव आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरणाने समारोप झाला. या स्पर्धेमध्ये जवळपास  ३२५ नावाजलेल्या मल्लांनी सहभाग नोंदवला तसेच पंचकमिटी तील एकूण २५ सदस्यांनी उत्कृष्ट कामकाज पहिले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आखाड्यात कुस्त्या लावण्यात आल्या. चेअरमन समाधान आवताडे यांनी कुस्ती या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवेढा पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी कुस्ती साठी निवड व्हावी त्यांना प्रेरणा मिळावीप्रत्येकाच्या घरी एक तरी पैलवान असावा हा उद्देश ठेवून जिल्हा कुस्ती संघ व समाधान आवताडे युवा मंचच्या वतीने ही स्पर्धा यशस्वीपणे राबवली.

    

स्पर्धेसाठी आलेल्या मल्लवस्ताद,पंच या सर्वांसाठी दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गेले दोन दिवस मैदान भरगच्च भरले होते. आयोजकांचे नेटके नियोजन हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.
या स्पर्धे मध्ये माती विभागा मधून ज्ञानेश्वर भास्कर जमदाडे तसेच गादी विभागामधून रवींद्र हणमंत शेंडगे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे सोलापूर जिल्ह्यातील हे दोन कुस्तीगीर जालना येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.या स्पर्धे मधील विजेत्या मल्लांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन येथोचित सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बक्षीस समारंभ प्रसंगी श्री. संत दामाजी सह. साखरकारखान्याचे  चेअरमन श्री समाधान आवताडे,पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर दामाजी संस्था अध्यक्ष विष्णुपंत आवताडे मार्केट कमिटी सभापती सोमनाथ आवताडे,प्रा. येताळा भगत सरदत्तात्रय जमदाडे सरखरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडेपंढरपूर तालीम संघाचे अध्यक्ष शेखरभाऊ भोसलेमहाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगरमहाराष्ट्र केसरी समाधान घोडकेभाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसेसोलापूर तुळजापूर मार्केट कमिटी सभापती सचिन पाटीलउस्मानाबाद जि. प. माजी अध्यक्ष  धीरज पाटील दामाजी कारखान्याचे संचालक राजन पाटीलसुरेश भाकरेमारुती थोरबोलेअशोक माळीभारत निकमतुळजापूरचे नगरसेवक अमर मगरतुळजाभवानी मंदिर चे पुजारी शशिकांत पाटीलचंद्रकांत पडवळेअनिल बोदडेदीपक मानेसुधाकर  मासाळसुहास पवार,  गजानन शिंदेॲड. दत्तात्रय तोडकरी, सचिन शिंदे, पै. राजेंद्र ओमणे, मारुती वाकडे, मुरलीधर सरकळेज्ञानेश्वर भगरेअशोक चौंडे काकासाहेब गायकवाड नितीन  ताडविठ्ठल ताडदामोदर घुले, नामदेव पडवळेविष्णू फटेनवनाथ पवारदत्ता साबणेशंकर मेटकरीबिबीशण बेदरेशिवाजी घोडकेसत्यजित सुरवसेदादा ओमणेजनार्दन कोंडूभैरीपरमेश्वर येणापेसंजय माळीबाळासाहेब कवाळेखंडू खंदारेशाम पवार तसेच दामाजी सहकारी कारखान्याचे संचालक खरेदी विक्री संघचे संचालक मार्केट कमिटीचे संचालकअनेक तालुक्यातील तालीम संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी सदर स्पर्धेसाठीइतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेसाठीसोलापूर जिल्हयातील अनेक नावाजलेले मल्ल सहभागी झाले होते .
कुस्ती स्पर्धेचे समालोचन धनंजय मदनेराजाभाऊ देवकतेअशोक उन्हाळे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा कुस्ती संघाचे सर्व पदाधिकारी श्री. समाधान आवताडे युवामंच पंढरपूर मंगळवेढा चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *