👁 11 Views

एसटी चालकाने विद्यार्थ्यांना शिव्या व धमकी देत गावापासून पुढे दोन किलोमीटर वर सोडले.. उपरी येथील प्रकार

पंढरपूर LIVE 18 डिसेंबर 2018

पालक व ग्रामस्थांमधून संताप
पंढरपूर,प्रतिनिधी
हात दाखवा व एसटी थांबवा या उद्देशाने ग्रामीण भागात नागरीकांची लालपरी सेवा करीत आहे.परंतु वारंवार या लालपरीला बदनाम करण्याचा प्रयत्न वाहक व चालकांकडून केला जात आहे.उपरी(ता.पंढरपूर)येथील शालेय विद्यार्थ्यांना शिव्या व धमकी देत गावापासून पळवत नेत दोन किलोमीटर अंतरावर उतरवून दिले आहे.यामुळे पालक व ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबधित चालका विरोधात पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पंढरपूर-सातारा रस्त्यावर 3 ते 4 हजार लोकसंख्या असलेले उपरी हे गावा आहे.गावतुन दररोज 70 ते 80 विद्यार्थी भाळवणी येथील न्यु इंग्लिश स्कुल मध्ये शिकण्यासाठी जातात.सोमवारी सायंकाळी हायस्कुल सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे विद्यार्थी भाळवणी थांब्यावर थांबले.त्यांनी सातारा-मेढा सोलापूुर (एमएच 14 बीटी 3079)या बसला हात दिला परंतु चालकाने  बस थांब्यावर न थांबविता अर्धा किलो मीटरवर थांबवली.पळत जावून विद्यार्थ्यांनी बस पकडली.उपरी गाव आल्यानंतर विद्यार्थ्यांना उतरवण्यासाठी वाहकाने बेल दिली.बसमधील इतर प्रवाश्यांनीही लहाण मुले आहेत,रात्र झाली थांबवा बस अशी विनंती केली परंतु मुजोर चालकाने(बॅच नंबर 12001)उपरीयेथील थांब्यावर  बस न थांबविता गावापासून पुूढे 2 किलोमीटरवर थांबवत मुलांना अर्वाच्च भाषेत आई वडीलांच्या नावाचा उध्दार करीत शिव्या दिल्या व पुून्हा माझ्या गाडीत बसायचे नाही,माझे कोण काय वाकडे करीत नाही,आज येथे सोडले परत थेट पंढरपूरलाच सोडेल असे धमकावत खाली उतरवले.
रात्रीच्या वेळेस दोन किलोमीट पायी चालत शालेय विद्यार्थ्यांनी गाव गाठले.हा सर्व प्रकार पालकांना सांगितल्या नंतर आगार प्रमुख व ग्रामीण पोलीसात याबाबत त्रकार दाखल करण्यात आली आहे.मागील काही दिवसांपुूर्वी बस  आडवून चालका सोबत हुज्जत घातली म्हणून ग्रामस्थांवर एसटी प्रशासनाने गंभीर स्वरुपाचा गून्हा दाखल केला होता.आता तेच प्रशासन मुजोर चालकावर कारवाई करणार का?हा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. 
    

ग्रामस्थांची ही दुसरी तक्रार ्रआहे.याबाबत संबधित विभागप्रमुखांसोबत संर्पक साधला असून चालकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.प्रवाश्यांसोबत चालकांची मुजोरी कुठल्याही परीस्थितीत सहन केली जाणार नाही—सुूनिल जाधव,आगार प्रमुख,पंढरपूर

रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर गावात बस गाड्या थांबत आहेत परंतु मेढा,दहिवडी,वाई या भागातील वाहक चालक मुद्दामहुून गावात गाड्या थांबवित नाहीत.त्यांच्यावर प्रशासनान कारवाई करावी अन्यथा पून्हा आम्ही रस्त्यावर उतरू—आण्णासाहेब नागणे,उपसरपंच,उपरी


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *