पंढरपूर LIVE 20 डिसेंबर 2018
पंढरपूर : दि. 19 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी व गीता जयंती निमित्त पंढरपूर इस्कॉनच्या वतीने वेगवेगळ्या कारागृहातील कैद्यांना व हॉस्पिटल येथे भगवद् गीतेचे वाटप करण्यात आले.
ही भगवद् गीता जशी आहे तशी श्रीकृष्ण कृपामूर्ती स्वामी प्रभुपाद लिखित असून शुद्ध-सोप्या भाषेत असून मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषांमध्ये असलेल्या या भगवद् गीतेचे सकाळपासून विविध ठिकाणी मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर कारागृह, राका हॉस्पिटल, राजहंस ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी अॅन्ड पॉली क्लिनिकसह अनेक ठिकाणी गीता महात्म्य सत्संग व गीता वाटपाचे नियोजन केले होते. या उपक्रमाला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इस्कॉन पंढरपूरच्या वतीने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कारागृहातील कैद्यांना, शाळा, कॉलेज व दवाखाने येथे संपूर्ण डिसेंबर महिन्यात भगवद्गीतेचे वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या भगवद्गीतेने माणसामध्ये चांगले परिवर्तन घडून येईल हा उद्देश आहे.
पंढरपूर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, इस्कॉनचे राधागिरीधारी दास, पंढरपूर नायब तहसीलदार एस.पी. तिटकारे, कारागृह प्रमुख पी.टी. शिंदे, पोलीस हवालदार एस.के. चव्हाण, पोलीस नाईक शिवाजी येडे व इतर मान्यवरांच्या हस्ते भगवद्गीताचे वितरण करण्यात आले.
मनुष्याच्या प्रत्येक अडचणीवर व संकटावर विजय प्राप्त होऊन सुखी-आनंदी जीवनासाठी भगवद्गीता आश्रय हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन ईस्कॉनचे साधक श्री. राधागिरीधारी दास यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ईस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद दास चक्रधर दास, मोहनराव दास, पांडवदास व शेगांवचे तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव जाधव, दत्तात्रय शिंदे, भोसे-पांढरेवाडीचे गोसेवक सचिन लोंढे, भोईर परिवार यांनी प्रयत्न केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com