👁 6 Views

24 डिसेंबरला पंढरीत भरणार शिवसैनिकांची वारी… अवघ्या महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिक पंढरीत येणार…

पंढरपूर LIVE 21 डिसेंबर 2018

प्रतिकात्मक छाया

अवघी पंढरी नगरी भगव्या रंगाने सजली… 
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे इस्कॉन घाटावर 
करणार चंद्रभागेची आरती… 
आरतीच्या ठिकाणची पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडून पाहणी 

येत्या 24 डिसेंबर रोजी भुवैकुंठ पंढरी नगरीमध्ये शिवसैनिकांची वारी भरणार आहे. आयोध्येत ‘पहेले राम मंदिर… फिर सरकार।’ ही घोषणा देऊन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वात आधी विठोबाच्या पावन भुमीतून या घोषणेचा पुनरुच्चार करणार आहेत. श्री.ठाकरे यांच्या या महासभेची जय्यत तयारी चालु असुन अवघी पंढरी नगरी भगवी झाली आहे. पंढरीच्या विविध भागात शिवसेनेचे भगवे झेंडे, स्वागत कमानी, डिजीटल्स झळलेले आढळून येत आहेत. शिवसेना प्रमुख येथील इस्कॉन घाटावरुन चंद्रभागेची आरतीही करणार आहेत. त्यामुळे या परिसराची पाहणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे.


‘पहेले राम मंदिर… फिर सरकार।’ चा नारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आयोध्या नंतर महाराष्ट्रातील पंढरपुरातून विठ्ठलाला साकडे घालून राम मंदिराच्या उभारणीसाठी आवश्यक त्या हालचालींना सुरुवात करणार आहेत. येत्या 24 डिसेंबरला पंढरपुरातील चंद्रभागा मैदानावर भव्य महासभेला संबंधित करणार आहेत. यासंबंधीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई हे नुकतेच पंढरीत येऊन विविध स्थळांची व तयारीची पाहणी करुन गेले. 


यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैलाताई गोडसे, संघटक अस्मिता ताई गायकवाड, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे, तालुकाप्रमुख महावीर देशमुख, प्रसिद्धीप्रमुख विनोद कदम जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तसेच विविध विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. राम मंदिर बांधण्यासाठी पंढरपुरातून विठ्ठलाला साकडे घालून संपूर्ण महाराष्ट्रात नारा दिला जाणार आहे. राम मंदिर हे फक्त शिवसेनाच बांधू शकते, शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सुरुवातीपासूनच ठेवलेला असून आता राम मंदिर सुद्धा बनवण्याच्या तयारीत शिवसेना आहे. याची घोषणा येत्या 24 डिसेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात करतील. या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू असून मोठ्या प्रमाणात राज्याच्या कानाकोपर्‍यातून शिवसैनिक, संत महंत वारकरी, हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतील. अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. 

या महासभेसाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या असुन नियोजनबद्ध व शिस्तबध्दरित्या सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत.  अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.

    

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *