👁 8 Views

शिवसेनेच्या महामेळाव्यासाठी लाखो शिवसैनिक व वारकर्‍यांची उपस्थिती… चंद्रभागेची महाआरती ठाकरे कुटूंबियांच्या शुभहस्ते संपन्न….

पंढरपूर LIVE 24 डिसेंबर 2018

संपुर्ण व्हिडीओ रिपोर्ट बघा… 


चंद्रभागेची महाआरती ठाकरे कुटूंबियांच्या शुभहस्ते संपन्न….



आज पंढरीतील चंद्रभागा मैदान येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या महामेळाव्यामध्ये बोलताना शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपा वर कडाडून टीका केली. ‘जय जवा म्हटलं की जवानांच्या शस्त्र खरेदीतील घोटाळा व जय किसान म्हटलं की शेतकर्‍यांसाठी असणार्‍या योजनांमधील घोटाळे समोर उभे राहतात. गेल्या अनेक वर्षापासुन राम मंदिराचा प्रश्‍न ज्यांना सोडवता आला नाही, ज्यांना शेतकर्‍यांच्या व्यथा समजत नाहीत अशांच्याबरोबर आम्ही काय टाळ कुटत बसायचे का? असा सवाल उपस्थित करुन ठाकरे यांनी यापुढे शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी व राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना एकटी लढेल हे स्पष्ट केले. याचबरोबर हा महामेळावा निवडणुका डोळ्याससमोर घेतलेला नाही असे सांगत आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो परंतु राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकणार्‍यांनी शब्द पाळलेला नाही. आम्ही मात्र राम मंदिराची उभारणी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असेही ते म्हणाले. यासह विविध विषयांवर ते भरभरुन बोलले. आजच्या महामेळाव्यासाठी व चंद्रभागेच्या महाआरतीसाठी सौ.रश्मीताई ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. 

क्षणचित्रे….


1)विठाई बससेवेचे उद्घाटन.



2) युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व रश्मीताई ठाकरेंची प्रमुख उपस्थिती.

3) रश्मीताई ठाकरे यांनी स्टेजवर न बसता समोर बसलेल्या महिला भगिणींमध्ये बसणं केलं पसंत.. स्टेजवरुन खाली उतरल्या ताई.

3) शिवसैनिकांमध्ये पसरले नवचैतन्य.






4) सहकुटूंब घेतले श्रीविठ्ठल रखुमाईचे दर्शन


आज पंढरीतील चंद्रभागा मैदान येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या महामेळाव्यासाठी लाखो शिवसैनिक व वारकरी भाविक उपस्थित होते. ‘विठुनामाचा जयजयकार… पहले राम मंदिर…फिर सरकार..!’ च्या गजर करत शिवसेनेेकडून या महामेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. श्रीराम, श्रीविठ्ठल व शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन महामेळाव्याचा शुभारंभ झाला. शिवसेनेचे उपनेते तथा सोलापूर व धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.आ. डॉ. तानाजीराव सावंत यांनी प्रास्ताविक केले. महामेळाव्यानंतर चंद्रभागेची महाआरती ठाकरे कुटूंबीययांच्या शुभहस्ते संपन्न झाली.



यावेळी यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री दिवाकर रावते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अभिनेते व शिवसेना नेते आदेश बांदेकर, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ.तानाजी सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडीच्या संजना घाडी, खा.विनायक राऊत, खा.अनिल देसाई, खा.अरविंद सावंत,  प्रा.शिवाजी सावंत, संहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे पाटील, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैलाताई गोडसे, जिल्हा महिला संघटक अस्मिता ताई गायकवाड, सोलापूर जिल्हा महिला सन्मवयक शैलाताई स्वामी,  महिला आघाडी  संघटक उज्वलाताई येलूरे, मा.जिल्हा प्रमुख साईनाथभाऊ अभंगराव, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवि मुळे, तालुका प्रमुख महावीर देशमुख, अतुल राजूरकर, मोहोळ येथील शिवसेना नेते चरणराज चवरे, प्रसिध्दीप्रमुख विनोद कदम आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *