👁 8 Views

ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत सतर्कता बाळगावी -अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे

पंढरपूर LIVE 28 डिसेंबर 2018

पंढरपूर दि. 27 :- ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी  ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत बाबत माहिती घेवून आपल्या हक्काबाबत सतर्कता बाळगावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून, तहसिल कार्यालय पंढरपूर व आखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती, शेतकी सभागृह पंढरपूर येथे ग्राहक मेळावा व परिसंवाद  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
 यावेळी तहसिलदार मधुसूदन बर्गे, पुरवठा निरिक्षक सी.जी.इंगोले, ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विनोद भरते, ग्राहक पंचायतीचे अण्णा ऐतवाडकर, सुभाष देशमुख,नंदकुमार देशपांडे, शशिकांत हरिदास व प्रविण कुलकर्णी उपस्थित होते.
            अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले,  ग्राहक संरक्षण कायद्यातंर्गत ग्राहकाला वस्तू निवडण्याचा, गुणवत्ता, दर्जा, प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे. ग्राहकांनी आपल्या हक्कांसोबत त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची जाणीव ठेवावी.  नागरीकांच्या सोयीसाठी विविध योजना शासनामार्फत राबविल्या जातात. या योजना सर्व सामान्य नागरीकांपर्यंत पोहोचत आहेत. याबाबत कोणत्या अडचणी आल्यास त्या प्रशासनामार्फत सोडविल्या जातील असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
यावेळी तहसिलदार बर्गे म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी खते, बी.बियाणे याबाबत ग्राहक पंचायतीने  जागृती आणि प्रसार केला असल्याचे सांगून, तालुक्यातील ग्राहक पंचायतीचे काम कौतुकास्पद असल्याचे  सांगितले. ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष  विनोद भरते यांनी  ग्राहक पंचायतीने जिल्ह्यात ग्राहकांना न्याय देण्याबाबत केलेल्या  कार्याची माहिती दिली.
यावेळी  अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या  व्यक्तींचा  सन्मान  तसेच वक्तृत्व व निंबध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायतीचे सदस्य, नागरीक उपस्थित होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *