Pandharpur Live 28 December 2018
श्री विठ्ठल अभियांत्रिकीत‘अविष्कार २०१८’ या संशोधन महोत्सवाचा समारोप
पंढरपूर-(संतोष हलकुडे) येथील संशोधन, विद्यार्थ्यांमधील चैतन्य, संशोधनाचे वातावरण, त्यातून स्वेरीत आयोजिलेल्या महोत्सवाचे उत्कृष्ठ नियोजन, नवसंशोधकांचा उत्कृष्ठ सहभाग यातून उत्कृष्ठ संशोधन निवडण्यासाठी परिक्षकांची झालेली तारेवरील कसरत आणि यातून अंधारात असलेल्या व ‘अविष्कार २०१८’ स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाशात आलेल्या नवसंशोधकांच्या चेहऱ्यावरील वाढलेला उत्साह पाहता असे संशोधनात्मक स्पर्धा महोत्सव वारंवार घ्यावेत. त्यामुळे संशोधनास उर्जा मिळून भविष्य उज्वल होईल आणि साहजिकच भारतीय विकासाला गती मिळेल.’ असे प्रतिपादन भारतीय संशोधन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावलेले पद्मश्री डॉ. रामकृष्ण होसूर यांनी केले.
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये‘अविष्कार २०१८’ या संशोधन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पद्मश्री डॉ. रामकृष्ण होसूर उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. समारोपाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. प्रारंभी विद्यापीठाचे सह-समन्वयक डॉ. एम.जी. माळी यांनी विद्यार्थ्यांना उर्जा देणाऱ्या या संशोधन स्पर्धेचा वृत्तांत सादर करून स्पर्धेत समवेश झालेल्या महाविद्यालये व विद्यार्थी तसेच परीक्षकांची कामगिरी यावर प्रकाश टाकला. यावेळी‘अविष्कार २०१८’ संशोधन स्पर्धेसंबंधी व येथील नियोजनाबाबत सिद्धार्थ कामत, अस्मिता गायकवाड, कृष्णकांत धुमाळ, आरजू शेख, अमोल वळसंगे, सूरय्या बिजापुरे, विजय साळवे यांच्यासह अनेक बाहेरून आलेल्या संशोधक स्पर्धकांनी उत्साहित व आनंदी मुद्रेने मनोगत व्यक्त करून नियोजन आणि महोत्सव याबद्धल समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, ‘स्पर्धेतील उत्साह महत्वाचा असून स्पर्धेतून पराभवानंतर देखील शिकता येते हे महत्वाचे आहे. कारण बक्षिसे मिळविण्यापेक्षा स्पर्धेत सभागी होणे हे अत्यंत महत्वाचे आहे. विद्यार्थी हे देशाचे प्रतिक असून त्यांचा विकास केला तर देशाचा विकास होईल. त्यातून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींची संख्या अधिक आहे. याचे विशेष कौतुक वाटते.
या संशोधन स्पर्धेत सोलापूर विद्यापीठांतर्गत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील पदवी,पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी तसेच एम.फील.व पीएच.डी. विभागातील संशोधक विद्यार्थी व मार्गदर्शक यांनी शोध संशोधन सादर केले होते. या स्पर्धेत डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालय सोलापूरने आठ पारितोषके जिंकली असून वालचंद कला आणि विज्ञान महा. सोलापूर- सहा, शिवाजी महा. बार्शी व सोलापूर फार्मसी महा.ने प्रत्येकी पाच, डी.ए.व्ही. वेलणकर महा. सोलापूर- चार, वालचंद इन्स्टिटयूट, सोलापूर -तीन, सोलापूरच्या हिराचंद नेमचंद महा., वि. गु. शिवधारे महा., पंढरपुरच्या अभियांत्रिकी महाविद्यालय व फार्मसी महा. यांनी प्रत्येकी दोन तर देशभक्त गरड महा. मोहोळ, एस.के. एन. महा.कोर्टी व के. बी. पी. महा.पंढरपूर, कर्मयोगी महा. शेळवे, सह्याद्री महा. मेथवडे, एन. बी. नवले महा. केगाव, सोलापूर विद्यापीठच्या सायन्स विभाग या महाविद्यालयांना प्रत्येकी एक असे मिळून एकूण ४६ बक्षिसे अविष्कार स्पर्धेतून महाविद्यालयीन स्पर्धकांनी मिळविली. त्यापैकी प्रत्येक विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेले यशस्वी स्पर्धक पुढीलप्रमाणे-कृषी व पशुसंवर्धन विभागामध्ये प्रथम- आरजू शेख, मल्लिकार्जुन हत्ताळे, संजय मिटकरी, बसवराज दामा, द्वितीय- वृषाली भोसले, नाझिया कल्याणी, राहुल शेळके. वाणिज्य,व्यवस्थापन आणि विधी विभागातून प्रथम-गौरी आसावा, संतोष भरले, निखील तळेकर, विश्वनाथ साळवे तर द्वितीय-पूजा सावंत, चंद्रकांत कानकुंटला, मुकुंदराव देशपांडे. अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण विभागातून प्रथम-शुभम तांदळे, प्रियांका सरवदे, सुभाष जाधव, केशवराव कुलकर्णी, द्वितीय-विकास परमार, अभिमान काडे, व्ही.ए. बिनगी, नरेंद्र काटीकर. मानव्यशास्त्र, भाषाशास्त्र आणि ललीत कला विभाग यामध्ये प्रथम- बाळकृष्ण हिबारे, प्रवीण कस्तुरे, सुलक्षणा ओहोळ, ज्योती वाघमारे, द्वितीय-संजय गौरव, विद्या यनगंडूल, जी.एम. पांडगळे, अमोल शेळके. वैद्यकीय आणि औषधनिर्माण शास्त्र विभागमध्ये प्रथम- दिलीप लोकरे, अशुदुल्ला पठान, मिथुन मणियार, सायबन्ना शिंगे, द्वितीय- वेनेला नामपल्ली,भगवान जाधवर, ए.बी. वळसंगे, नाझिया खान. विज्ञानशास्त्र विभागातून प्रथम- करिष्मा दबक, बाबासाहेब आतकरे, सुरेश घाडगे, आर.जी.गवळी तर द्वितीय–नम्रता देवसानी, पी. व्ही. विभूते, एस. आर. सोनवणे, एस.पी.देशमुख यांनी पारितोषके मिळविली. यावेळी, डॉ. व्ही. पी. धुळप, डॉ. ए. डी. विभूते, व्ही. एम. मुच्छाले, जी.आर. आराध्ये, बी. एम. खुने सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलसचिव प्रा.डॉ. व्ही.बी.घुटे व स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यापीठाचे पदाधिकारी, अविष्कारचे विद्यापीठ समन्वयक डॉ. एस.डी.राऊत व स्वेरीचे समन्वयक डॉ. ए. बी. शिंदे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापक व विद्यापीठ अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयातील संशोधक स्पर्धक उपस्थित होते. सूत्रसंचालन व स्पर्धांमधील निकालांचे वाचन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com